छत्रपती श्री शिवाजी तरुण मित्र मंडळाचा ज्वलंत विषयावर जिवंत देखावा
सांगावा न्यूज, पिंपरी चिंचवड. दि. १३ : शहरातील भोसरी परिसरात काही गणपती मंडळांनी हलत्या मूर्त्यांचे देखावे तर काही मंडळांनी जिवंत देखावे साकार केले. गणपती बाप्पांच्या विविध मनमोहक मुर्त्यांचे दर्शन गणेश भक्तांना होत असते. तसेच दर वर्षी पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळे वेगवेगळे सामाजिक विषय घेवून जन जगृतीपर जिवंत देखावे सादर करीत असतात. भोसरीतील फुगे आळी येथील छत्रपती श्री शिवाजी तरुण मंडळ म्हणजेच भोजापूरचा राजा मंडळाने यंदा साकार केलेला देखावा - नाचणारे नव्हे, तर वाचणारे व्हा ! हा गणेश भक्तांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे. यामध्ये सध्य परिस्थितीत तरुण तरुणी आपले रिल्स व्हिडिओ काढण्यात दंग असून यामध्ये त्यांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. रील्स काढतांना आपण धोके ओळखले पाहिजेत आणि आपले प्राण वाचवले पाहिजेत असा आशय आणि विषय घेवून भोजापूरचा राजा ने उत्तम जिवंत देखावा सादर केला. प्रेक्षक आणि गणेश भक्तांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळत असून समाजातील ज्वलंत विषयावरील या लाईव्ह स्टेज शो मध्ये थिएटर द रायझिंग स्टार्स च्या कलाकारांनी उत्तम अभिनय केला.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा