Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४

हिट अँड रन नव्हे, तर रन फॉर हेल्प ! दिघी रोडचा राजा चा जिवंत देखावा

 नरवीर तानाजी तरुण मंडळाचा महत्त्वाच्या विषयावर जिवंत देखावा देखावा 


सांगावा न्यूज, पिंपरी चिंचवड. दि. १३ : शहरातील भोसरी परिसरात काही गणपती मंडळांनी हलत्या मूर्त्यांचे देखावे तर काही मंडळांनी जिवंत देखावे साकार केले. गणपती बाप्पांच्या विविध मनमोहक मुर्त्यांचे दर्शन गणेश भक्तांना होत असते. तसेच दर वर्षी पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळे वेगवेगळे सामाजिक विषय घेवून जन जगृतीपर जिवंत देखावे सादर करीत असतात. भोसरीतील दोघी रोड येथील नरवीर तानाजी तरुण मंडळ म्हणजेच दोघी रोडचा राजा मंडळाने यंदा साकार केलेला देखावा - हिट अँड रन नव्हे, तर रन फॉर हेल्प ! हा देखवा विविध ठिकाणी घडत असलेल्या हिट अँड रन प्रकरणावर भाष्य करणारा आहे. यातून निष्पाप लोकांचा बळी जातो. आपल्या हौसेपाई इतरांचे जीव घेण्याचे आपल्याला काय अधिकार अशी संवादफेक करून हुल्लडबाजी करणाऱ्यांच्या कानशिलात मारली आहे. शिवाय पालकांनी देखील आपल्या मुलांना मोठ-मोठी आणि महागडी वाहने सुपूर्द करतांना ते चालवण्याची त्याची पात्रता आहे का ते तपासले पाहिजे यावर देखील परखडपणे भाष्य केले आहे. शेवटी स्वामी विवेकानंद यांच्या भूमिकेत पात्र रंगवून स्वामी हे आपल्या देशातील तरुणांना अधिकारवाणीने समजावून सांगतात. असा हा जिवंत देखावा सध्या गणेश भक्तांमध्ये प्रबोधन करीत आहे. दोघी रोडचा राजा राजा अर्थात नरवीर तानाजी तरुण मंडळाने साकार केलेला जिवंत देखावा लोकांचे प्रबोधन करीत आहे . प्रेक्षक आणि गणेश भक्तांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळत असून समाजातील ज्वलंत विषयावरील या लाईव्ह स्टेज शो मध्ये थिएटर द रायझिंग स्टार्स च्या कलाकारांनी उत्तम अभिनय केला.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा