Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४

कर्तृत्ववान बाप : श्रीराम मित्र मंडळाचा जिवंत देखावा , हृदयस्पर्शी

 श्रीराम मित्र मंडळ लांडगे आळी भोसरी यांचा ' वडिलांवर भावनिक जिवंत देखावा 


सांगावा न्यूज, पिंपरी चिंचवड. दि. १३ : शहरातील भोसरी परिसरात काही गणपती मंडळांनी हलत्या मूर्त्यांचे देखावे तर काही मंडळांनी जिवंत देखावे साकार केले. गणपती बाप्पांच्या विविध मनमोहक मुर्त्यांचे दर्शन गणेश भक्तांना होत असते. तसेच दर वर्षी पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळे वेगवेगळे सामाजिक विषय घेवून जन जगृतीपर जिवंत देखावे सादर करीत असतात. भोसरीतील लांडगे आळी येथील श्रीराम मित्र मंडळाने यंदा  साकार केलेला जिवंत देखावा - कर्तृत्ववान बाप !

आजच्या गतिमान युगात भौतिक सुखाच्या पाठीमागे धावणाऱ्या मुला मुलींना आई वडिलांचा विसर पडतो. आणि लग्न झाल्यानंतर आई वडिलां पासून वेगळे राहतात. उतरत्या वयात त्यांच्या गरजा अपेक्षा पार धुळीस मुलांकडून मिळवल्या जातात . मुलाला काहीही अडचण आली तरी बाप त्याच्या मदतीसाठी तत्पर राहून मुलाची अडचण दूर करतो. मुलांवर कुठलाच संकट बाप येवू देत नाही. मुलाला लहानाचे मोठे करून शिक्षण त्याच्या शिक्षण नोकरी उद्योग उभे करून देण्यात बाप महत्वाची भूमिका निभावून आपलं कर्तव्य पार अडतो. पण जेव्हा मुलावर जबाबदारी पेलण्याची वेळ येते तेव्हा मात्र याच कर्तृत्ववान बापाकडे मुलाचे दुर्लक्ष होते. 

जेव्हा या जगातून बाप निघून जातो तेव्हा मुलाला बापाची किंमत कळते. तेव्हा सर्वकाही वेळ निघून गेलेली असते. वडिलांसाठी काहीतरी करून दाखवले असले तरी ते पाहायला वडिलच जिवंत नाहीत तेव्हा त्या मुलाच्या कर्तबगारीला शून्य किंमत होते. वडिलांचे कर्तव्य मुलाला उमगणारा आशय आणि विषय घेवून श्रीराम मित्र मंडळाने समाज जन जागृतीपर जिवंत देखावा उत्तमरीत्या सादर केला .

हा जिवंत देखावा सध्या गणेश भक्तांमध्ये प्रबोधन करीत आहे. श्रीराम मित्र मंडळाने साकार केलेला जिवंत देखावा लोकांना भावनिक करून सोडतो. प्रेक्षक आणि गणेश भक्तांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळत असून समाजातील ज्वलंत विषयावरील या लाईव्ह स्टेज शो मध्ये थिएटर द रायझिंग स्टार्स च्या कलाकारांनी उत्तम अभिनय केला.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा