Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, १५ सप्टेंबर, २०२४

ऑनलाईन मध्ये गुंगलाय तरुण : लोंढे तालीम मित्र मंडळाचा जिवंत देखावा लोकांचे प्रबोधन करतोय

 लोंढे तालीम मित्र मंडळाचा जिवंत देखावा तरुणांना सावध करून जागृत करणारा ठरतोय 


सांगावा न्यूज, पिंपरी चिंचवड. दि. १५ : शहरातील भोसरी परिसरात काही गणपती मंडळांनी हलत्या मूर्त्यांचे देखावे तर काही मंडळांनी जिवंत देखावे साकार केले. गणपती बाप्पांच्या विविध मनमोहक मुर्त्यांचे दर्शन गणेश भक्तांना होत असते. तसेच दर वर्षी पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळे वेगवेगळे सामाजिक विषय घेवून जन जगृतीपर जिवंत देखावे सादर करीत असतात. भोसरीतील बापूजी बुवा चौक येथील लोंढे तालीम मित्र मंडळाने यंदा  साकार केलेला जिवंत देखावा - ऑनलाईन मध्ये गुंगलाय तरुण , हा जिवंत देखावा -  रम्मी सारख्या गेम्स आणि इतर भुरळ घालणाऱ्या गेम्स खेळणाऱ्या तरुणांची कानउघडणी करणारा ठरत आहे.

आजच्या मल्टिमीडिया युगात आणि सोशल मध्येमाच्या जगात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईल फोनवर इंटरनेटवर असलेल्या फसव्या गेम्स ने भुरळ घातली आहे. त्यामध्ये आपला तरुण गुंतला असून अशा या गेम्स च्या नादात तसेच शेअर मार्केट, फॉरेक्स मार्केट सारख्या ऑनलाईन गेम्स ने तर तरुणांना अक्षरशः घेरले आहे. यात तरुण वर्ग बुडत चालला असून कुटुंब धोक्यात येत आहेत. लोकांची आर्थिक फसवणूक होत आहे. ही गेम्स आणि विविध अँप्स च्या मध्येमातून लोकांची चाललेली लूट थांबावी म्हणून लोंढे तालीम मित्र मंडळाने प्रबोधनपर जिवंत देखावा सादर केला आहे त्यातून जनजागृती होत आहे.

हा जिवंत देखावा सध्या गणेश भक्तांमध्ये प्रबोधन करीत आहे. लोंढे तालीम मित्र मंडळाने साकार केलेला जिवंत देखावा लोकांना फसव्या गेम्स पासून सावध करून सोडतो. प्रेक्षक आणि गणेश भक्तांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळत असून समाजातील ज्वलंत विषयावरील या लाईव्ह स्टेज शो मध्ये थिएटर द रायझिंग स्टार्स च्या कलाकारांनी उत्तम अभिनय केला.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा