विभागीय स्पर्धेत चमकले 'स्वराज' चे खेळाडू : धाराशिव येथे पार पडलेल्या शालेय विभागीय कबड्डी स्पर्धेत यश
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र होणारा तालुक्यातील पहिला कबड्डी संघ
सांगावा, धाराशिव. दि. २ : भूम शहरातील नामांकित असलेल्या रवींद्र हायस्कूल च्या विद्यार्थी कबड्डी संघाने जिल्हा धाराशिव येथे काल दिनांक १ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या विभागीय कब्बडी सपर्धेत विजय मिळवला. त्यामुळे शाळेचा कबड्डी संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला असून हा तालुक्यातील पहिला असा संघ आहे जो राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा खेळणार आहे.
अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या या संघातील सर्वच खेळाडू हे स्वराज क्रिडा मंडळाचे खेळाडू असून या खेळाडू मध्ये यशोदीप कांबळे, आदित्य जगदाळे, सुजय कुटे, ओम पाटील, मयूर पाटील, साहिल सुरवसे, मोहित माने, अमित राऊत, विनायक आहेर, देव येलंबकर, पृथ्वीराज पवार या खेळाडूंचा सहभाग होता. हे सर्व खेळाडू NIS प्रशिक्षक तथा क्रीडाशिक्षक अमर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश होरे, अक्षय बाराते, स्वप्नील सुपेकर यांच्या मार्गदर्शनात सराव करतात. त्यांच्या पुढील दैदिप्यमान कारकीर्दीस मनःपूर्वक शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा