Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४

साठलेल्या कचऱ्यावर आरोग्य विभागाची तात्काळ कार्यवाही : सांगावा बातमीचा परिणाम

 थेरगाव परिसरातील कचरा रोज उचलला जातो : आरोग्य विभाग ग प्रभाग 


येथे कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही केली जाईल : आरोग्य विभाग 

सांगावा, थेरगाव. दि. २ : पिंपरी चिंचवड शहरातील ग ग प्रभागांतर्गत येणाऱ्या काळेवाडी फाटा येथे आज सकाळी बी आर टी बस स्टॉप मार्गातील ब्रीज खाली प्रचंड कचऱ्याचा ढीग साठला होता. त्याची बातमी सांगाव न्यूज  च्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केली होती. या बातमीची दाखल घेवून आरोग्य विभागाने अवघ्या तासाभरात येथील कचरा उचलून परिसर स्वच्छ केला. त्यामुळे नागरिकांनी कर्मचारी यांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.

सांगावा न्यूज वर कचऱ्याचे ढीग असलेली बातमी पब्लिश केल्यानंतर थेरगाव येथील आरोग्य कर्मचारी यांनी तात्काळ सांगावा न्यूज शी संपर्क साधून सांगितले की परिसरातील कचरा रोज उचलला जातो. परंतु आज गाडीचा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कचरा उचलायला उशीर झाल्याचे सांगितले.

काळेवाडी फाटा बी आर टी बस स्टॉप मार्ग आणि १६ नंबर ब्रीजच्या आतील फूटवर लोकं कचरा टाकत आहेत. ती जागा कचरा टाकायची नाही. त्यामुळे लोकांची जबाबदारीचे भान राखून तिथे कचरा टाकला नाही पाहिजे. इथून पुढे तिथे नागरिकांनी असा रस्त्यावर उघड्यावर कचरा टाकू नये म्हणून नियमाने दंडात्मक कार्यवाही केली जाईल असेही आरोग्य विभागाकडून सांगितले गेले. यापूर्वीही वेळोवेळी याठीकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही केली आहे. तरीही सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा बेजबाबदार नागरिक याठिकाणी कचरा टाकत आहेत. त्यांच्यावर देखील लक्ष देवून दंडात्मक कार्यवाही केली जाईल असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा