Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, १३ ऑक्टोबर, २०२४

शेकडो महिला बहिणीचा काळुराम नढे यांच्याकडून सन्मान

 काळेवाडी येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान योजनेचे आयोजन


सांगावा, काळेवाडी. दि. १३ :  महाराष्ट्र शासनाने  गेल्या काही महिन्यामध्ये अनेक योजना सुरू केले आहेत,  त्यामध्ये महत्त्वाची योजना ठरली ती म्हणजे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना , या योजना 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली यामध्ये 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना दीड हजार रुपये असा आर्थिक लाभ देण्यात आला आहे .महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत शहरांमधील परिसरातून मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला, त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी भागात आझाद मित्र मंडळ स्पोर्ट क्लब, आमदार लक्ष्मण भाऊ जगताप मित्र परिवार व पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य काळूराम नढे यांच्या मार्फत व पिंपरी चिंचवड शहर भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काळुराम नढे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे परिसरातील शेकडो बहिणीचा  ऑनलाईन अर्ज भरून देण्यात आले, त्यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी सन्मान योजनेचे( दिनांक 13) रोजी आयोजन करण्यात आले होते .

यावेळी काळूराम नढे म्हणाले, की जून महिन्यात महाराष्ट्र राज्याच्या महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडके बहीण योजना सुरू करण्यात आली, ही योजना बहिणीसाठी महत्त्वाची व गरजेचे आहे .ही योजना बंद होणार असे आपले सावत्र भाऊ कितीही सांगत असले ,तरी ही योजना कधीच बंद होणार नाही व लाडक्या बहिणीला त्यांच्या प्रत्येक महिन्याला लाभ भेटणार आहे असे सांगितले .पिंपरी चिंचवड शहरात स्व. लक्ष्मण भाऊ जगताप यांनी  नागरिकांच्या हिताची व विकासाची कामे केली आहेत. त्यामध्ये येणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात आपण सर्वांनी लक्ष्मण भाऊ जगताप यांचा वारसा व विचार जपणारे शंकर भाऊ जगताप यांना साथ दिली पाहिजे ,तसेच महाराष्ट्रातील महिलांनी मुख्यमंत्री लाडके बहीण योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 ही नवीन मुदतवाढ दिली आहे .यापूर्वी या योजनेचा अर्ज केला नाही अशा महिलांनी लवकरच लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान केले आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या व प्रबोधनकार शारदा मुंडे म्हणाल्या की ,आझाद मित्र मंडळ स्पोर्ट क्लब व काळुराम नढे यांच्या मार्फत अनेक सामाजिक आर्थिक ,शैक्षणिक ,वृक्षप्रेमी, आरोग्य यासारख्या सामाजिक कार्यक्रमातून काळुराम नढे हे कार्य करत असतात .मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मार्फत त्यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालय येथे असंख्य महिला भगिनीचा ऑनलाईन फॉर्म भरून देऊन त्याने सामाजिक कार्य केले आहे. यामध्ये अनेक लाभार्थी  महिलांना आज साडेसात हजार रुपये प्राप्त झाले आहेत .या सर्व लाभार्थी महिलांनी छोटासा व्यवसायाला सुरुवात करावी व आपल्या परिवाराला सक्षम करावे, तसेच महायुती सरकार अनेक महिला बहिणीसाठी व परिवारासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत ,आपण या सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आव्हान केले. 

काळूराम नढे यांच्यामार्फत लाडक्या बहिणी योजनेसाठी ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी मदत करणाऱ्या सेविका राजश्रीताई मुंडकर व बर्डे ताई यांचा एक प्रतिनिधीक स्वरूपात सर्व महिला भगिनींच्या सन्मान म्हणून त्याचा या ठिकाणी  महिलांचा व लाभार्थी महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या सन्मान कार्यक्रमाला पुढील मान्यवर उपस्थित ह .भ. प शारदाताई मुंडे ,राष्ट्रीय पंच प्रमोद मोरे सर, सामाजिक कार्यकर्ते, मार्गदर्शक इंद्रभान वाकचौरे ,राजु  शिंदे, अतुल नढे, श्याम नढे ,युवराज नढे ,प्रवीण मोहिते , मा.नगरसेविका निताताई पाडळे , सचिन काळे ,किरण मुडकर व इतर महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा