Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४

छोट्या आणि मोठ्या पडद्यावर दिसणारे अभिनेते अतुल परचुरे आज काळाच्या पडद्याआड

 अतुल परचुरे यांच्या निधनाने महाराष्ट्र हळहळ व्यक्त करीत असून प्रेक्षकांना दुःखद धक्का बसला आहे.


पहा अतुल परचुरे यांच्या भूमिका असलेले सिनेमे, नाटकं आणि मालिका 

सांगावा न्युज, मुंबई. दि. १४ : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कलाकार अभिनेते अतुल परचुरे यांचे दीर्घ आजाराने आज सोमवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुःखद निधन झाले. त्यांना अनेक दिवसांपासून कॅन्सर या आजाराने ग्रासले होते. यातून ते बरेही झाले होते. परंतु पुन्हा हा आजार त्रासदायक ठरत असल्याने उपचार चालू होते. शेवटी नियतीपुढे कुणाचेच काही चालत नाही. काळाने घाला घातला आणि मराठी सह हिंदी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे छोट्या आणि मोठ्या पडद्यावर दिसणारे अभिनेते अतुल परचुरे आज काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

जाणून घेऊयात अतुल परचुरे यांनी विविध मध्येमात केलेल्या कामांची यादी. सिनेमाच्या बाबतीत बोलायचे झाले तर - गॉड ओनली नोज, चोर मचाये शोर , क्या दिल ने कहा , स्टाइल , क्योंकि... मैं झूठ नहीं बोलता, मेरी प्यारी बहनिया बनेगा दुल्हनिया, फिर भी दिल है हिन्दुस्तानी, बेदर्दी, खिचड़ी , यकिन चकाचक, तुमासा नाही देखा, नवरा माझा नवसाचा, जांतरंम मातरम्, कलकत्ता मेल, आम्ही सातपुते, इट्स ब्रेकिंग न्युज, पार्टनर, अवारपण, सलाम ए इश्क, मेरा दिल लेके देखो, अंजने द अन् नोन, याकिन, कलयुग, क्युंकी, ब्रेव हार्ट, जाणीव, चोरो की बारात, जिंदगी फिफ्टी फिफ्टी, नारबाची वाडी, लव्ह रेसिपी, छोडो कल की बाते, बुढ्ढा होगा तेरा बाप, खट्टा मिठा, मुस्कुराके देख जरा, ऑल द बेस्ट, डिटेक्टीव्ह नानी आणि बिल्लू अशा विविध चित्रपटात आपल्या भूमिका साकार करून रसिक मनावर अभिनयाचा प्रभाव पडला आहे.

अलीकडे त्यांनी केलेला 'अलिबाबा आणि चाळीशीले चोर' हा सिनेमा शेवटचा ठरला. 

भागो मोहन प्यारे, जगो मोहन प्यारे,आरके लक्ष्मण की दुनिया , कॉमेडी नाइट्स विद कपिल, कॉमेडी सर्कस , कॉमेडी सर्कस के अजूबे ,भ से भाडे , बड़ी दूर से आए हैं , यम हैं हम , होनार सुन मी हया घरची , आळी मीली गुपचिली ,माझा होशिल ना ,दूर से नमस्ते या प्रसिद्ध मालिकां आणि टीव्ही शो सह अनेक कार्यक्रमात अतुल परचुरे महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत.

प्रियतम, वासू ची सासू, आम्ही आणि आमचे बाप, वाह गुरू, टिळक आणि आगरकर, व्यक्ती आणि वल्ली, नातीगोती, तुज आहे तुजपाशी, तरुण तुर्क म्हातारे अर्क, गेला माधव कुणीकडे, कापूसकोंड्याची गोष्ट, या नाटकातील त्यांच्या भूमिका गाजलेल्या आहेत

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा