Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, ६ ऑक्टोबर, २०२४

डि आय एफ टी फाउंडेशन तर्फे डाॅ. डि वाय पाटील ए सी एस काॅलेज पिंपरी सोबत सृजनम डिझाईनर फॅशन शो संपन्न

 
सांगावा, पिंपरी चिंचवड. दि. ६ : डि एफ एल फॅशनिस्ताज प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने डाॅ डी वाय पाटील आर्ट्स, काॅमर्स आणि सायन्स काॅलेज पिंपरी च्या फॅशन डिझायनिंग डिपार्टमेंट सोबत विद्यार्थ्यांनी बनवलेले १०० डिझायनर ड्रेस फॅशन शो मधे  प्रदर्शित करण्यात आले.

या प्रसंगी डिफेन्स फोर्स लीग व डि आय एफ टी फाउंडेशन तर्फे पुर्व सैनिकांचा उपस्थितीत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून डि वाय पाटील विद्यापीठाच्या डाॅ. रोहीणी सोमनाथ पाटील यांना डि एफ एल तर्फे मेडल ऑफ हाॅनर देऊन सन्मानित करण्यात आले. डाॅ. डि वाय पाटील कॉलेज मॅनेजमेंटच्या समवेत प्रिन्सिपल डाॅ. रणजित पाटील व ईतर स्टाफ उपस्थित होते . 

डि एफ एल ग्रुप चे फाउंडर श्री नरेश गोल्ला यांनी वूमन एमपाॅवरमेंट  ला प्रमोट करण्यासाठी या विशेष फॅशन शो मध्ये विद्यार्थीनींना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला . अनोख्या फॅशन शो मध्ये  पुर्व सेनानी व नेवी कॅडेट तर्फे " वाॅक फाॅर प्राईड " करण्यात आले . 

डिफेन्स फोर्स लीग चे प्रेसिडेंट पैरा कमांडो रघुनाथ सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले . 

कार्यक्रमाच्या शेवटी अवार्ड्स मध्ये विद्यार्थ्यांनी आनंदाने जल्लोष केला . 

आयोजकांमधे नरेश गोल्ला, राजेंद्र जाधव, सुनिल वडमारे, मुजीब खान, सिद्धाराम बिराजदार, रघुनाथ सावंत, निलेश विसपुते,  दृष्टी जैन , कोमल मोजीद्रा, रूषीकेश जाधव , एश्वर्या डोरले यांचा सहभाग होता. 

सूत्रसंचालन निलेश विसपुते व डि वाय पाटील कॉलेजच्या प्रतिमा चव्हाण यांनी केले. आभार प्रदर्शन फॅशन डिपार्टमेंट च्या सरस्वती देशमुख यांनी केले.












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा