सांगावा, मुंबई. दि. ७ : आपले अंगभुत कलागुण दाखवत सूरज चव्हाण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला तसा तो सुप्रसिद्ध रियालिटी शो बिग बॉसच्या घरातही पोहचला. आपलं सर्वोत्तम प्रदर्शन करीत शेवटी तो बिग बॉस मराठी सिझन ५ चा विजेता ठरला. सूरज चव्हाण विजेता ठरल्या बरोबर बिग बॉस प्रोग्राम हेड आणि सिनेमा दिग्दर्शन केदार शिंदे यांनी नवीन सिनेमाची घोषणा केली आणि त्या सिनेमात सूरज चव्हाण हिरो असल्याचे जाहीर केले. शिवाय सिनेमाचे नाव देखील सांगितले ते म्हणजे ' झापुक झूपुक '
झापुक झूपुक सिनेमा घेवून येत आहेत केदार शिंदे. बाई पण भारी, नंतर नवीन सिनेमा घेवून येत असल्याची घोषणा केदार शिंदे यांनी बिग बॉस च्या मंचावर केली. बिग बॉस च्या अंतिम खेळात सूत्रसंचालक रितेश देशमुख यांनी विजेत्याचे नाव सूरज चव्हाण जाहीर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि महाराष्ट्रभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सुरजच्या विजयने महाराष्ट्र भावनिक झाला आनंदी झाला. सुरज चव्हाण केवळ प्रसिद्ध झाला नव्हे तर त्याने स्वतः ला सिद्ध केले आहे. आज प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही त्याने साधेपणा सोडला नाही. त्याचा तोच सच्चेपणा पाहून महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांनी सूरजला आपल्या काळजात जागा दिली आहे. सूरजची लोकप्रियता पाहून म्हणा किंवा त्याचे कौशल्य आणि प्रतिभा म्हणा, याचा विचार आज मुख्य प्रवाहातील सिने सृष्टीला करावा लागतो त्याची दाखल घ्यावी लागते. चित्रपट क्षेत्राने आज सामान्य कलाकारांची दखल घेण्यामध्ये सामान्य घरातील कलाकारांचा जेवढा वाटा आहे तेवढाच सोशल मीडियाचा आहे. कारण सोशल मीडियाने सामान्य घरातील कलाकारांना एक स्टेज उपलब्ध करून दिला जो पूर्वी टॅलेंट असूनही मिळत नव्हता. आज सोशल मिडीयामुळे संधी मिळाली आहे. सूरज चव्हाणच्या यशातही महत्वाचा वाटा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा आहे तसाच त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचा आहे. आज बिग बॉस मराठी टीमनेही त्याला विजेता ठरवून या वाट्यात सहभाग नोंदवला. आज केदार शिंदे यांनी सूरज चव्हाण ला हिरो म्हणून सिनेमात घेण्याची घोषणा केली आणि सुरजचाच एक फेमस डायलॉग झापुक झुपूक हाच सिनेमाचे शीर्षक असणार आहे. असे केदार शिंदे यांनी बिग बॉस च्या मंचावर सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा