काळेवाडीतील माता भक्तांचा तोच जल्लोष, तोच उत्साह
सांगावा, काळेवाडी. दि. ७ : काळेवाडी येथे विष्णू राज मंगल कार्यालय ज्योतिबा नगर काळेवाडी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी स्वीकृत नगरसेवक नवनाथ दादा नढे पाटील यांच्या वतीने व जय मातादी फ्रेंड सर्कल यांच्यावतीने नवरात्री उत्सवानिमित्ताने भव्य रास दांडियांचे आयोजन करण्यात आले आहे .नवरात्र उत्सवानिमित्ताने नवनाथ दादा नढे पाटील हे गेले अनेक वर्ष भव्य रास दांडियाचे महिला माता भगिनींसाठी आयोजन करत असतात .त्यामुळे काळेवाडी ज्योतिबा नगर व काळेवाडीच्या परिसरातील सर्व माता-भगिनी, युवा मुले ,मुली या रास दाडिया मध्ये शेकडोच्या संख्येने सहभागी होत असतात. नवनाथ दादा नढे पाटील यांच्या वतीने हा नवरात्र महोत्सव मोठ्या आनंदी उत्साहात साजरा करण्यात येतो. तसेच पिंपरी चिंचवड शहराचे माजी नगरसेवक व विरोधी पक्षनेते विनोद भाऊ नढे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आज विष्णुराज मंगल कार्यालय येथे केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या ,यावेळी विनोद भाऊ नढे यांनी व नवनाथ दादा नढे पाटील यांनी आलेल्या माता भक्तांसोबत रास दांडिया खेळण्याचा आनंद घेतला ,तसेच या भव्य रास दांडियामध्ये सहभागी झालेल्या महिलांनी व युवा रास दांडिया प्रेक्षकांनी तसेच काळेवाडी परिसरातील नागरिकांनी व माता भगिनी यांनी नवनाथ दादा नढे पाटील यांनी महिलांसाठी भव्य रास दांडियाचे आयोजन केल्याबद्दल नवनाथ दादा नढे पाटील व जय मातादी फ्रेंड सर्कल यांचे आभार व्यक्त केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा