Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४

अजित भाऊ गव्हाणे यांना आमदार करण्यासाठी रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचा जाहीर पाठिंबा

 


सांगावा न्युज, भोसरी. दिनांक : १४ : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडी भोसरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार श्री अजित दामोदर गव्हाणे यांना रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचा जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे. हा पाठिंबा आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी, महिलांच्या रक्षणासाठी, गोरगरीब समाजाच्या विकासासाठी, आरोग्यासाठी, समाजातील शैक्षणिक बावी सुधारण्यासाठी हा पाठिंबा देत आहोत असे पिंपरी चिंचवड शहराचे व जिल्ह्याचे अध्यक्ष माऊली उर्फ किसन भोसले यांनी माहिती दिली. गेली बारा वर्षे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर रिपब्लिकन जनशक्ती पक्षाची युती आहे आणि महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. अजित भाऊ गव्हाणे यांनी भोसरी मध्ये नगरसेवक असताना अनेक जनतेचे कामे केले असून सामान्य माणसाच्या प्रश्नांना त्यांनी योग्य ते न्याय दिलेला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातून निश्चितपणे विजय होणार असून या विजयामध्ये रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचा महत्त्वाचा खारीचा वाटा उचलणार असून आघाडीचे उमेदवार म्हणून अजित भाऊ गव्हाणे निवडून येतील असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा