"लोकनेते आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आजच्या सभेतून स्वतः भोसरीकरांना परिवर्तनाचा संदेश दिला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच आदरणीय पवार साहेबांच्या विचारांना मानणारा भाग राहिला आहे. स्वतः साहेबांनी आदेश दिलाय म्हटल्यावर आता परिवर्तनावर शिक्कामोर्तब झालं आहे.
या सभेस उपस्थित असलेला प्रचंड जनसमुदाय हा भोसरी करांच्या मनात असलेल्या परिवर्तनाच्या इच्छेचे प्रतीक आहे. दडपशाहीला विकासाने प्रत्युत्तर देण्यासाठी आपण सगळे येत्या २० तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून मला भक्कम बळ देणार हा मला विश्वास आहे"
_____ अजित गव्हाणे ( भोसरी विधानसभा : उमेदवार - महाविकासा आघाडी )

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा