Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४

भाऊसाहेब भोईर यांच्या चिंचवड येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न

 

चिंचवडमधून भव्य पदयात्रा : भाऊसाहेबांसोबत हजारो लोकं रस्त्यावर उतरून पदयात्रेत सहभागी


चिंचवड, प्रतिनिधी. दिनांक. १४ : उद्योग नगरी पिंपरी चिंचवड शहराला सांस्कृतीक नगरी म्हणून नव्याने ओळख निर्माण करून देण्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे भाऊसाहेब भोईर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहेत. त्यांना कपाट हे चिन्ह मिळाले असून हे चित्र मतदार संघात घराघरात पोहचवण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. नुकतेच भाऊसाहेब भोईर यांच्या चिंचवड येथील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सामान्य नागरिक उपस्थित होते.

गेली आठ - दहा दिवसांपासून मतदारसंघात पदयात्रा, प्रत्यक्ष मतदारांच्या गाठी भेटी, संवाद बैठका घेवून चिंचवड मतदारसंघ पिंजून काढला जात आहे. या प्रचार दौऱ्या दरम्यान मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. काल दिनांक १३ नोव्हेंबर रोजी चिंचवड येथे निवडणूक काचेरी चे भव्य उद्घटन करण्यात आले. त्या अगोदर चिंचवड मधून भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. चिंचवडगाव आणि परिसर भाऊसाहेब भोईर यांचा बालेकिल्ला असून या भागांतून भरपूर लीड मिळेल असा अंदाज आहे.

यावेळी झालेल्या संवाद सभेत भाऊसाहेब भोईर म्हणाले की, " आपण विविध टॅक्स भरतो पण त्या पैशाचा पुढे भ्रष्टाचार झालेला दिसतो. तेव्हा लोकांनी भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी माझ्या पाठीशी उभे राहावे. महानगर पालिकेच्या गेल्या दोन वर्षात दोनशे कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. लोकांच्या पैशाची उधळपट्टी थांबवली पाहिजे. सत्तेतील लोकांना वाटतं की आपण धन शक्तीच्या जोरावर कुणालाही विकत घेवू शकतो, पण आता लोकांनी ही निवडणूक हातात घेवून जनशक्ती दाखवली पाहिजे. उमेदवाराची पार्श्वभूमी पाहून आपले अमूल्य मत व्यक्त केले पाहिजे. चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या २० तारखेला कपाट या चिन्हासमोरील बटण दाबून बदल घडवावा. मी तुमच्या सोबत आहे"

दरम्यान भव्य पदयात्रा काढण्यात आली. याची सुरूवात मोरया गोसावी क्रीडांगण येथून सुरुवात होऊन विठ्ठल रुक्माई मंदिर येथे सांगता झाली. पदयात्रा मार्ग मोरया गोसावी क्रीडांगण - मोरया गोसावी राज पार्क फेज 1 - राज पार्क शनी मंदिर कचेरीचे उद्घाटन - काकडे पार्क - पोतदार शाळा - राजू गावडे यांचा बंगला - गजानन महाराज मंदिर - भीम नगर - बुद्ध विहार - केशवनगर शाळा - साईबाबा मंदिर - विठ्ठल रखुमाई मंदिर - शनी मंदिर - काळभैरवनाथ मंदिर - मंगलमूर्ती वाडा - धनेश्वर मंदिर - मोरया गोसावी मंदिर - सुखकर्ता - राम मंदिर हनुमान मंदिर - गांधी पेठ कचेरी उद्घाटन - भाजी मंडई - अमित कॉम्प्लेक्स - गोखले वृंदावन - शांतीबन - जुना जाकात नाका - सिल्वर गार्डन - चाफेकर चौक - भुई आळी - विठ्ठल रुक्माई मंदिर या मार्गात लोकांनी उत्साह दाखवला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा