सांगावा न्युज, भोसरी. दि. १८ : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील सर्व मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. प्रचार रणधुमाळीत पायाला भिंगरी लावून पळणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि उमेदवार आज थोडा विसावा घेतील. आता उत्सुकता मतदान आणि निकालाची.
भोसरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री अजित गव्हाणे यांनी आज आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या.
"गेली अनेक वर्षं वेगवेगळ्या कारणांसाठी भोसरी विधानसभेच्या नागरिकांना भेटतोय. मागचे काही दिवस विधानसभेचा उमेदवार म्हणून सर्वांची भेट घेतोय. दोन्ही प्रसंगी भोसरी विधानसभेच्या नागरिकांनी खूप खूप प्रेम दिलं आहे. हे प्रेम, हा विश्वास माझं बळ ठरतंय.
महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तर जीवाचं रान केलं आहे. उमेदवार जरी मी असलो, तरी स्वत:च उमेदवार असल्यासारखी ही सगळी माणसं पळतायत, ते भोसरी विधानसभेच्या भल्यासाठी.
नागरिकांचं प्रेम आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाच्या जोरावर मी खात्रीनं सांगू शकतो, यंदा गुलाल आपलाच… तुतारी वाजणार, बदल घडणार"
__ अजित गव्हाणे ( भोसरी विधानसभा उमेदवार : महाविकास आघाडी )

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा