सांगावा न्युज, भोसरी. दि. १८ : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील सर्व मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. प्रचार रणधुमाळीत पायाला भिंगरी लावून पळणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि उमेदवार आज थोडा विसावा घेतील. आता उत्सुकता मतदान आणि निकालाची.
पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुलक्षणा शीलवंत धर यांनी आज आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या.
"पिंपरी विधनासभ मतदार संघातील नागरिक मला आणि माझ्या कुटुंबीयांना जवळून ओळखणारे आहेत. आमच्या कुटुंबावर प्रेम करणारे आहेत. तसेच पिंपरी विधानसभा मतदार संघ हे माझे कुटुंब आहे. आपण सर्व कार्यकर्ते नागरिक यांनी केलेल्या सहकार्य बद्दल मनपूर्वक आभार. मतदारांनी अभ्यासपूर्ण आणि उमेदवाराची पार्श्वभूमी पाहून मतदान करावे"
____ सुलक्षणा शीलवंत धर ( पिंपरी विधानसभा उमेदवार : महाविकास आघाडी)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा