Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०२४

आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावून प्रगतीशील महाराष्ट्रासाठी एक पाऊल पुढे टाकूया. ____ शंकर जगताप ( चिंचवड विधानसभा उमेदवार : महायुती )

 

सांगावा न्युज, भोसरी. दि. १८ : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील सर्व मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. प्रचार रणधुमाळीत पायाला भिंगरी लावून पळणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि उमेदवार आज थोडा विसावा घेतील.  आता उत्सुकता मतदान आणि निकालाची.

चिंचवड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी आज आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या.

"नमस्कार, मी जगताप शंकर पांडुरंग चिंचवड विधानसभेचा भारतीय जनता पार्टी व महायुतीचा अधिकृत उमेदवार.... सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनम्र आव्हान करतो की, येणाऱ्या २० तारखेला बुधवारी सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावून प्रगतीशील महाराष्ट्रासाठी एक पाऊल पुढे टाकूया.

धन्यवाद...!

____ शंकर जगताप ( चिंचवड विधानसभा उमेदवार : महायुती )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा