Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, २४ नोव्हेंबर, २०२४

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन



सांगावा न्युज, पिंपरी चिंचवड. दि. २४ नोव्हेंबर : पिंपरी चिंचवड शहरात डिजिटल मीडिया कार्यशाळा आयोजित केली होती, यामध्ये मोलाचे योगदान असलेल्या पत्रकारांचा सन्मान सोहळा आज रविवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ रोजी थेरगाव येथे संपन्न झाला. मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्न असलेल्या पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने सन्मान सोहळा आयोजित केला. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री एस एम देशमुख यांच्या हस्ते सन्मान सोहळा पार पडला. यावेळी विश्वस्त शरद पाबळे , जिल्हाध्यक्ष सुनिल लोणकर, विभागीय सचिव गणेश मोकाशी यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्कार समारंभ निमित्त दिवाळी फराळाचे आयोजन देखील केले गेले.

यावेळी बोलतांना श्री एस एम देशमुख म्हणाले की, आपण डिजिटल मीडिया परिषदेअंतर्गत घेतलेली कार्यशाळा उपस्थित सर्व पत्रकारांना फायदेशीर ठरली. डिजिटल मीडिया मधील तांत्रिक बाबी बारकाईने जाणून घेता आल्या. आज डिजिटल मीडिया काळाची गरज असून आपण त्यामध्ये पारंगत होणे गरजेचे आहे. हा कार्यक्रम घेण्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व पत्रकारांचे मनपूर्वक आभार मानले. पत्रकारांच्या हितासाठी मराठी पत्रकार परिषद सदैव कार्यरत आहे. पत्रकारांच्या सुःख दुःखात आम्ही नेहमीच सोबत आहोत. 

या कार्यक्रमा वेळी श्री शरद पाबळे, गणेश मोकाशी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. डिजिटल मीडिया अधक्ष महावीर जाधव, प्रिंट मीडिया अध्यक्ष श्री अनिल वडघुले , अविनाश आदक, सागर सूर्यवंशी, संतोष गोतावळे, विनय सोनवणे, प्रसाद वडघुले, माऊली भोसले, पराग डिंगनकर, चिराग फुलसुंदर, रमेश साठे, श्रावणी कामात, रेखा भेगडे, नरेश जिनवाल, मारुती बानेवार, विनायक गायकवाड,  प्रकाश जमाले, राकेश पगारे, सिद्धांत चौधरी, श्रद्धा प्रभुणे, अविनाश कांबीकर, राम गायकवाड, देविदास लिमजे, अशोक कोकणे या पत्रकारांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचान श्री अनिल वडघुले यांनी केले, श्री महावीर जाधव यांनी प्रस्तावना केले तर मारुती बानेवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा