Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, १ डिसेंबर, २०२४

आमदार महेश लांडगे आणि आमदार शंकर जगताप यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पिंपरी चिंचवड जिल्हा कार्यालयला भेट

 हिंदू सारा एक मंत्र हा दाहि दिशांना घुमवू या ..

धरती-नभ-पातळहि भारु प्राण पणाला लावूया ..

आर एस एस जिल्हा कार्यालय पिंपरी चिंचवड शहर याठिकाणी भेट देताना आमदार महेशदादा लांडगे व आमदार शंकरभाऊ जगताप व आर एस एस चे कार्यकर्ते पदाधिकारी 

सांगावा न्युज, पिंपरी चिंचवड. दि. १ : विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुती ला मिळालेल्या अभतपूर्व यशानंतर भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे आणि भाजप शहराध्यक्ष व चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पिंपरी चिंचवड जिल्हा कार्यालययात जाऊन उपस्थितांची भेट घेतली व भारतमातेचे पूजन केले.

" संघ आणि संघाच्या विविध क्षेत्रातील स्वयंसेवकांनी या निवडणुकीत धर्मज्ञा समजून हिंदुत्वासाठी मतदान करायला खूप प्रयत्न केले होते. आम्ही देखील भविष्यात हिंदुत्वासाठी जे जे आवश्यक ते ते सर्व कार्य करू अशी उपस्थितांना ग्वाही दिली आहे. यावेळी प्रांत कार्यकर्ते आमचे सदैव मार्गदर्शक असलेले श्री हेमंतराव हरहरे यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला. यावेळी मा. जिल्हा संघचालक श्री. विनोदजी बन्सल आणि पूर्ण जिल्हा कार्यकारिणी उपस्थित होते. श्री हेमंतराव यांनी उपस्थित आम्हा सर्वांना मोलाचं मार्गदर्शन केलं. यामुळे आम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळाली.
माझ्या कडून भारतमातेची सेवा सदैव घडत रहो यासाठी मी प्रयत्न करेन. धन्यवाद "
____ महेश लांडगे ( आमदार - भोसरी )

हिंदू सारा एक मंत्र हा दाहि दिशांना घुमवू या ..
धरती-नभ-पातळहि भारु प्राण पणाला लावूया ..

असे घोषवाक्य लिहून आमदार महेश लांडगे यांनी सोशल मध्येमावर पोस्ट केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा