Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०२४

चिंचवड मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी मतदार संघातील लोकं माझ्या पाठीशी उभे ! ____ अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर

 

सांगावा न्युज, चिंचवड. दि. १७ : पिंपरी चिंचवड या शहराला उद्योग नगरी अशी ओळख आहे. ती सर्वश्रुत आहे. परंतु नव्याने सांस्कृतिक नगरी म्हणून पिंपरी चिंचवड शहर ओळखले जाऊ लागले याचे सर्व श्रेय भाऊसाहेब भोईर यांना जाते. कारण सुप्रसिद्ध आणि दिग्गज कलाकार एकत्र आणून त्यांचे कार्यक्रम आयोजित करणे आणि शहरातील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे हे कार्य भाऊसाहेब भोईर यांच्या हातून अविरतपणे घडत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्ष असलेले भाऊसाहेब आता चिंचवड विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार आहेत. 

भाऊसाहेब हे कपाट या चिन्हावर ते निवडणूक लढवत असून चिंचवड मतदार संघात जोरदार प्रचार सुरू आहे. काल दिनांक १६ रोजी उद्योग नगर, दळवी नगर, भोईर नगर, इंदिरा नगर, प्रेमलोक पार्क याठिकाणी पदयात्रा झाली. लोकांनी अलोट गर्दी करत प्रतिसाद दिला. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उद्योग नगर, दळवी नगर, भोईर नगर, इंदिरा नगर, प्रेमलोक पार्क परिसर भाऊसाहेब भोईर यांचा बालेकिल्ला. या भागातून गेली अनेक वर्ष ते नगरसेवक म्हणून उत्तम कार्य करीत आहेत. त्यामुळे एकजुटीने भाऊसाहेबांच्या पाठीशी आहोत. अशा भावना येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या.

बालेकिल्ल्यात एक गठ्ठा मतदान होणार असल्याचा विश्वास येथील कार्यकर्ते आणि पदाधिकारी सांगत आहेत.  या भागात भाऊसाहेबांनी केलेले कार्य लोकं कधीही विसरणारले नाहीत. त्यामुळे यंदा भाऊसाहेबांना विधानसभेत पाठवण्यासाठी मतदारांनी कंबर कसून कार्यकर्ते आणि नागरिक कामाला लागले आहेत. 

उद्योग नगर, दळवी नगर, भोईर नगर, इंदिरा नगर, प्रेमलोक पार्क या परिसरात स्वतः भाऊसाहेब यांचे वास्तव्य असल्यामुळे परिसर भयमुक्त व शांत आहे. त्याच पद्धतीने संपूर्ण चिंचवड मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी मतदार संघातील विविध भागातील लोकांनी अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांच्या पाठीशी उभे राहून भाऊसाहेबांना आमदार करावे असे आवाहन कार्यकर्ते लोकांना घरो घरी जाऊन सांगत आहेत.

या भागात झालेल्या पदयात्रेचे वैशिष्ट्ये म्हणजे मतदार स्वतः भाऊसाहेब भोईर यांच्या पदयात्रेत सहभागी होऊन सकारात्मक वातावरण निर्माण करीत आहेत. कसलीही अपेक्षा न ठेवता प्रचंड संख्येमध्ये लोकं भाऊसाहेबांच्या रॅलीत सहभागी होत आहेत. असे चित्र मतदार संघात जागोजागी पाहायला मिळत आहेत. ही जमेची बाजू चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना विधानसभेत पाठवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

" मी गेली २५ वर्ष राजकारण आणि समाजकारणात आहे. तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य संपूर्ण देशात माहिती आहे. साहित्य कला क्रीडा क्षेत्रातील भरीव कार्य देखील सर्वश्रुत आहे. शिवाय उद्योग नगर, दळवी नगर, भोईर नगर, इंदिरा नगर, या भागात नगरसेवक म्हणून गेली २५ वर्ष केलेले कार्य लोकांना माहीत असल्यामुळे त्यांना वेगळं सांगायची गरज नाही. चिंचवड विधानसभा निवडणुकीत मला कपाट हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून लोकांना वाटतं की माझ्या प्रचार रॅलीत सहभागी होऊन हातभार लावावा. 

केवळ याच भागात नव्हे तर संपूर्ण चिंचवड मतदार संघात वेगवेगळ्या भागातून लोकांचा मला सकारात्मक पाठिंबा आहे. परिवर्तन घडवून आणण्यासाठी लोकं आणि मी स्वतः सज्ज आहोत. वेगवेगळे पक्ष आणि संघटनेत मला स्वतः येवून भेटतात पाठींबा देतात त्यामुळे मला मोठे बळ मिळाले असून यंदा लोकांच्या आशीर्वादाने विधानसभेत चिंचवड च्या सर्वांगीण विकासासाठी मी विधानसभेत प्रतिनिधित्व करेल असा विश्वास आहे". अशी भावना भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा