सांगावा न्युज, भोसरी. दि. १६ : महारष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहचली असून प्रत्येक मतदार संघात मतदारांमध्ये उत्सुकता लागली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात देखील दुरंगी लढत असून महायुतीचे उमेदवार श्री महेशदादा लांडगे यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. दादांचा जनसंपर्क मोठा असून मतदारसंघात पकड आहे. हीच पकड आणखी मजबूत करण्यासाठी उद्या दिनांक १७ नोव्हेंबर रोजी महेशदा लांडगे यांचा प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय श्री. योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होणार आहे.
प्रखर हिंदुत्ववादी नेते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय श्री. योगी आदित्यनाथजी यांची 'विजयी सभा' रविवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ठीक ०२.०० वाजता , गावजत्रा मैदान, भोसरी येथे होणार आहे.
तरी भोसरी मतदार संघातील तमाम नागरिकांनी या 'विजयी सभेस' उपस्थित राहावे अशी विनंती मतदार बंधू भगिनींना श्री महेशदादा लांडगे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा