सांगावा न्युज, चिंचवड. दि. १९ : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षात जवळपास एक लाखापेक्षा अधिक मतदारांची भर पडली आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात नागरिकांना मूलभूत सुविधा निर्माण करून देण्यावर मी भर देणार आहे. या मूलभूत सुविधा मिळाल्या तरच खऱ्या अर्थाने मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यास वेळ लागणार नाही. असा विश्वास महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी नागरिकांना दिला.
किवळे - मामुर्डी परिसरात संपन्न झालेल्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जागोजागी फुलांच्या वर्षावात आणि फटाक्यांची आतिषबाजी करून जगताप यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
![]() |
| Advertisement |


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा