Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, १० नोव्हेंबर, २०२४

युवक - युवतींनी आपले "अण्णा, पिंपरी पुन्हा", "विजयी भवं" असे फलक हातात घेऊन प्रचार फेरीत सहभाग घेतला !  हे सर्व विजयाचे संकेत आहेत" __ सदाशिव खाडे

 

सांगावा न्युज, पिंपरी. दि. १० :  तुकाराम नगर येथे होणाऱ्या एकूण मतदानापैकी ७५ टक्के मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी महापौर योगेश बहल यांनी येथे व्यक्त केला.

पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस - भारतीय जनता पार्टी - शिवसेना - आरपीआय आठवले गट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ शनिवारी, संत तुकाराम नगर भागामध्ये पदयात्रा काढण्यात आली यावेळी बहल बोलत होते.

यावेळी भाजपचे नेते पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष माणिकराव अहिरराव, ज्येष्ठ नेते नंदू कदम, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, माजी नगरसेवक व कामगार नेते यशवंत भोसले, वसंत शेवडे, नारायण बहिरवाडे, जितेंद्र ननवरे, मोहम्मद भाई पानसरे, विजय कापसे, अमिना पानसरे, बबनराव गाढवे, शाम लांडे, संतोष कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष फजल शेख, तुकाराम पडवळ, जयदेव अक्कलकोटे, मायला खत्री, सुनील पालांडे, प्रतिभा जवळकर, निलेश आष्टेकर, राष्ट्रवादी युवती शहराध्यक्ष वर्षा जगताप, ज्ञानेश्वर कांबळे, सतीश लांडगे, हेमंत मोरे, किरण सुवर्णा, संजय अवसरमल, रविंद्र ओव्हाळ, तुकाराम बजबळकर, रमेश चिमूरकर, शिवसेनेचे राजेश वाबळे, दीपक पाटील, दिनेश पाटील, मंगेश धाडगे, अजय चव्हाण, संपत पाचुंदकर, दयानंद पेरकर, राखी धर, राहुल खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

"आज आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारानिमित्त प्रसन्न वातावरण संत तुकाराम नगर मध्ये निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्र पक्षांचे सर्व कार्यकर्ते न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने आज एकत्र आले आहेत. हे पाहता संत तुकाराम नगर मध्ये होणाऱ्या एकूण मतदानापैकी ७५ टक्के मतदान हे अण्णा बनसोडे यांना होऊन ते प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास आहे" __  योगेश बहल म्हणाले ( राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष )

"संत तुकाराम नगरमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे अण्णा बनसोडे हे होणाऱ्या मतदानापैकी ७५ ते ८० टक्के मतदान घेऊन विजयी होतील हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांचे भाकीत खरे ठरणार आहे. पदयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी पुष्पवृष्टी करून शुभेच्छा दिल्या, सवाष्ण महिलांनी औक्षण केले. युवक - युवतींनी आपले "अण्णा, पिंपरी पुन्हा", "विजयी भवं" असे फलक हातात घेऊन प्रचार फेरीत सहभाग घेतला. हे सर्व विजयाचे संकेत आहेत" __ सदाशिव खाडे (भाजप नेते व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष ) 

Advertisement 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा