Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

भाऊसाहेब भोईर यांचा वैयक्तिक गाठी भेटीचा धडाका

     काळेवाडी थेरगाव परिसरातून लोकांचा पाठिंबा !



सांगावा न्यूज, चिंचवड. दिनांक : ७ : चिंचवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी आज काळेवाडी -  थेरगाव - रहाटणी या भागात वैयक्तिक गाठीभेटी करून प्रचार केला. यावेळी त्यांनी मा. नगरसेविका ज्योती भारती, विमल काळे, विजया सुतार, विनोद नढे, संतोष कोकणे,  नेताजी नखाते, संजय नरळकर, शंकर नढे, बाळासाहेब नढे, सुरेश नढे, संभाजी नढे, उषा काळे, रवी नांगरे,  दिनेश नडे, प्रवीण पाटील आधी मान्यवर व्यक्तींना ते भेटले. तसेच थेरगाव आणि रहाटणी परिसरात प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जावून सुसंवाद साधला जात आहे.वैयक्तिक भेटी-गाठी आणि जनसंपर्कावर सध्या भाऊसाहेबांनी जोर देवून मतदार संघातील जनतेशी संवाद साधत आहेत.

भोईर यांनी आज काळेवाडी थेरगाव रहाटणी भागात वैयक्तिक भेटीगाठीतून अनेक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्याचबरोबर तेथील नागरिकांना दैनंदिन जीवनात त्यांना भेडसावत असणारे प्रश्न कसे सोडवता येथील  याचा प्रयत्न करून नागरिकांना दिलासा दिला जाईल अशी ग्वाही दिली.

"चिंचवड येथील मतदार संघात मतदारांची संख्या वाढली. मात्र, समस्या जैसे थेच आहेत. त्यामध्ये २४ तास पाणी पुरवठ्याचा प्रश्न असू द्या, वाढती वाहतूक कोंडीची समस्या असो की घन कचरा व्यवस्थापन, याकडे आत्तापर्यंत इथल्या सत्ताधाऱ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं आहे. हेच प्रश्न घेऊन मी मतदारांच्या पाठींब्यावर या निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय आहे. चिंचवडच्या जनतेला भेडसावत असलेले प्रश्न मी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे"

_____ भाऊसाहेब भोईर ( अपक्ष उमेदवार : चिंचवड विधानसभा )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा