आंबेडकरी विचारांच्या आझाद समाज पार्टीचा काळे यांना जाहीर पाठिंबा
सांगावा न्युज, चिंचवड. दि. ७ : खासदार अँड. चंद्रशेखर आझाद (रावण) यांच्या आझाद समाज पार्टीने चिंचवडचे स्वराज्य राष्ट्र निर्माण सेनेचे उमेदवार सतीश काळे यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे काळे यांची ताकद वाढणार आहे. आझाद पार्टीला मानणाऱ्या आंबेडकरी समुदायाची ताकद काळे यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. त्यामुळे काळे यांच्या गोठात आणखीन ३० हजार मतांनी भर पडणार आहे. आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. चंद्रशेखर आझाद यांच्या विषयी तरुणांमध्ये क्रेझ आहे. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांच्या पार्टीचा विस्तार देशभर झाला आहे. महाराष्ट्रात देखील पार्टीचे मोठे समर्थक आहेत. या पार्टीकडून चिंचवड विधानसभेबाबत आपली भूमिका जाहीर करण्यात आली. राज्याचे महासचिव ऍड. क्रांती सहाणे यांनी पत्र देऊन चिंचवड विधानसभेतील स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेनेचे उमेदवार सतीश काळे यांना पाठिंबा जाहीर केला. पार्टी कडून देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की सतीश काळे गेल्या २५ वर्षापासून पिंपरी चिंचवड शहर तसेच महाराष्ट्र भर शिवराय शाहू फुले आंबेडकर आण्णा भाऊ साठे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विचाराने समाज जोडण्याचे तसेच नवनिर्मितीचे काम करत आहेत. सर्व जाती धर्माच्या जनतेचे प्रश्न सुटावेत, यासाठी विविध आंदोलने करत आहेत. आपल्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आझाद समाज पार्टी पक्षाच्या वतीने २०५ चिंचवड विधान सभा मतदार संघात जाहीर पाठींबा देत आहोत. तसेच सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की, सतीश भास्कर काळे यांना शिवण यंत्र या चिन्हा समोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन पक्षाचे वतीने करण्यात आले.
काळे यांना मिळणार ३० हजार मते !
पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर विचारांच्या अनुयायांचा आझाद समाज पार्टीला मोठा पाठिंबा आहे. तरुणांकडून विशेष पाठिंबा या पक्षाला मिळत आहे. चिंचवड विधानसभेत पक्षाचे सुमारे ३० हजार समर्थक मार्गदर्शक आहेत. या सर्वांची मतरूपाने ताकद सतीश काळे यांना मिळणार आहे. काळे यांनी मताची आघाडी घेतल्यास ते तगडा विरोधक ठरतील अशी चर्चा आहे.
"गेलं वीस वर्षांपेक्षा अधिक काळ पुरोगामी चळवळीत घालवला आहे. त्यामुळे अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मला यामध्ये पाठिंबा दिला आहे. आझाद समाज पार्टीने देखील पाठिंबा दिल्याने आणखीन ताकद वाढणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांचे विचार घरोघरी पोहोचवण्याला बळ मिळणार आहे"
__________ सतीश काळे ( उमेदवार : चिंचवड विधानसभा - स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना )

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा