Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०२४

हिंदू संस्कृतीवर घाला घालणाऱ्यांना वेळीच रोखा ___स्वामी गोविंददेव गिरी महाराज

 चिंचवड येथे शिवचैतन्य जागरण यात्रा व भव्य संत संमेलन


सांगावा न्युज, चिंचवड. दि. ६ : देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवावी लागेल. आगामी काळात सावध राहत हिंदू संस्कृतीवर घाला घालणाऱ्या फुटीरतावादी व संस्कृती विरोधी शक्तींना थारा देऊ नका, असे आवाहन अयोध्येतील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले. 

 स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्या शिवचैतन्य जागरण यात्रेमध्ये संस्कृती संवर्धन व विकास महासंघ पिंपरी चिंचवड आयोजित संतसंमेलनात ते बोलत होते. चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित संमेलनाला व्यासपीठावर मोरया गोसावी मंदिराचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त श्री उमाप, संत तुकाराम महाराज संस्थान देहुचे मुख्य विश्वस्त ह.भ. प.पुरुषोत्तम महाराज मोरे, संस्कृती संवर्धन व विकास महासंघाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष ह.भ.प.किसन महाराज चौधरी त्याच बरोबर आळंदी देवाची संस्थान चे भावार्थ देखणे ही प्रामुख्याने उपस्थित होते. मठ, मंदिरे आणि आश्रम ही हिंदू समाजाची उर्जास्थाने असल्याची भूमिका गोविंददेव गिरी महाराज यांनी मांडली. ते म्हणाले, "छत्रपती श्री शिवाजी महाराज आपले आदर्श आहे. हिंदवी स्वराज्यात शास्त्र, साधू, संत, तीर्थस्थाने, तीर्थयात्रा या सर्वांच्या माध्यमातून संस्कृती संवर्धनाचे कार्य झाले. आज संविधानाच्या रक्षणासाठी संस्कृतीचे संवर्धन होणे गरजेचे आहे. हिंदू टिकला तर संविधान टिकेल. त्यामुळे संविधान आणि धर्माच्या रक्षणासाठी आपण १०० टक्के मतदान व्हायलाच हवे.'' १०० टक्के मतदान आणि संविधानीक मुल्यांच्या रक्षणातून आपला देश जगात सर्वश्रेष्ठ बनवूया असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातील शंखनाद व मातृशक्तीने औक्षण करून महाराजांचे स्वागत केले.प्रास्ताविक ह.भ.प.किसन महाराज चौधरीप्रार्थना डॉ.अजित जगताप, सूत्रसंचालन प्रसन्न देशपांडे यांनी केले. संत संमेलनाला साधु-संतांबरोबरच विविध मठ मंदिरांचे शेकडो प्रतिनिधी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा