Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०२४

भाऊसाहेब भोईर यांचा प्रचार उत्साहात सुरू : सांगवी मधून दिग्गज राजकीय व्यक्तिंच्या भेटीगाठी

 चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी माझ्याकडे मास्टर प्लॅन तयार _____ भाऊसाहेब भोईर 


सांगावा न्युज, सांगवी. दि. ६ : चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार श्री भाऊसाहेब भोईर यांनी आज सांगावीमधून प्रचाराला सुरुवात केली. जुनी सांगवी येथील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर माध्येम प्रतिनिधींशी संवाद साधून सांगावी परिसरातील राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांसच्या भेटीगाठी घेतल्या. आपण भाऊसाहेब भोईर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे दिग्गजांनी सांगितले. थेट मीडिया समोर येवून संवाद साधणे शक्य नसल्याने आपण फ्रंटला न येता भाऊसाहेबांच्या प्रचार कार्य करणार असल्याचे सांगितले.

सांगवी परिसरात प्रचारा दरम्यान नागरिकांनी आणि महिला भगिनींनी भाऊसाहेब भोईर यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर मतदारांच्या घरी जावून प्रत्यक्ष भेटी गाठी घेवून सुसंवाद साधला. दरम्यान स्वतः लोकांनी प्रचारात सहभागी होऊन व्यथा मांडल्या त्या नक्कीच आपण सोडवुन घेवू असा शब्द भाऊसाहेब भोईर यांनी दिला. एकंदरीत सांगवी परिसरातून देखील श्री भोईर यांना प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे चित्र निदर्शनास आले.

भ्रष्टाचार मुक्त शहर करणार 

" मेट्रो वगैरे हे होत राहतील ते झालेच पाहिजे पण शहरातील जीवन वहिनी पवना, मुठा , इंद्रायणी या तिन्ही नद्या प्रदूषणमुक्त झाल्या पाहिजेत. पाण्याचे मारून प्रदूषण नियंत्रणात आणता येत नसते. त्याला प्रत्यक्ष कार्य करून उपाय योजना करावी लागते. लोकांनी माझी कार्य करण्याची क्षमता आणि पार्श्वभूमी पाहून मतदान करावे आणि नक्कीच लोकं माझ्या पाठीशी उभे आहेत. केवळ विकासाचा दिखाऊ पणा करून चालणार नाही. प्रत्यक्ष काम झाले पाहिजे. शहरात जी भ्रष्टचार बोकाळला आहे. दहशत फोफावली आहे. ती थांबवणे गरजेचे आहे. मी आमदार झालो तर पहिल्यांदा भ्रष्टाचार मुक्त शहर करणे हा मुख्य उद्देश पूर्ण करीन" _____ भाऊसाहेब भोईर ( अपक्ष उमेदवार : चिंचवड विधानसभा )

Advertisement 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा