Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०२४

शहरातील विकासकामांना गती देण्याबाबत सर्वोतोपरी सकारात्मक प्रयत्न केले जातील ___ आमदार महेश लांडगे

 

विविध प्रकल्प आणि प्रस्तावित विकासकामांबाबत आयुक्त शेखरसिंह आणि आमदार महेश लांडगे यांच्यामधील बैठक संपन्न : सकारात्मक चर्चा 

सांगावा न्यूज, पिंपरी चिंचवड. दिनांक १३ : पिंपरी चिंचवड शहरातील ऑटो क्लस्टर येथे लोकप्रतिनिधी आमदार महेश लांडगे , आमदार शंकर जगताप आणि प्रशासक आयुक्त शेखरसिंह यांच्यामध्ये बैठक झाली. शहरातील विविध प्रकल्प आणि प्रस्तावित विकासकामे वेळेत मार्गी 

लावण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. पिंपरी चिंचवड महानरपालिकेचे प्रशासन यासाठी सज्ज असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी या बैठकीत दिली असल्याची माहिती आमदार महेश लांडगे यांनी सोशल मध्येमानवर पोस्ट करून सांगितली. या बैठकीत आमदार शंकर जगताप, विधान परिषद आमदार अमित गोरखे यांसह वेगवेगळ्या प्रशासकीय डिपार्टमेंटचे अधिकारी हजर होते. 

पिंपरी चिंचवड शहरातील नवीन विकसित होणारा भाग तसेच शहरात समाविष्ट असणाऱ्या गावांमधील जलनि:सारण व्यवस्थापण, गरजेच्या ठिकाणी नवीन जलवाहिनी तयार करणे, पाणी पुरवठा तसेच जलस्त्रोतासह विविध प्रस्तावित प्रकल्प मार्गी लावणे या या कामांसह इतर नगरी सेवांच्या कामासाठी लागणारा निधी मंजूर व्हावा म्हणून आमदार या नात्याने 

येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये लक्ष वेधणार असून राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील असे आमदार महेश लांडगे यांनी यावेळी सांगितले.

पिंपरी चिंचवड मधील पर्यावरण संवर्धन व नागरी आरोग्याच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानानुसार जलवाहिनींची देखभाल व दुरूस्ती करणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता तसेच गुणवत्ता वाढवणे, हवा प्रदूषण नियंत्रण यावर उपाययोजना, पवना बंद पाईपलाईन प्रश्न मार्गी लावणे , मिळकतकर सर्व्हेक्षण मार्गी लावणे, लाईट हाऊस तसेच कॅन्सर हॉस्पिटल थेरगाव आणि सारथी हेल्पलाईन सक्षमीकरण इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. आपल्या शहरातील विकासकामांना गती  देण्यासाठी  सकारात्मक कार्यवाहीच्या सूचना दिल्या असल्याची माहिती देखील आमदार महेश लांडगे यांनी दिली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा