Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शनिवार, १८ जानेवारी, २०२५

' ती ' या लघुचित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग येत्या रविवारी पाषाण पुणे येथे होणार

 

| सांगावा न्यूज | पुणे दिनांक १६ : आज स्पर्धेच्या युगात आणि धकाधकीच्या जीवनशैलीत पालक आणि मुलांमधील संघर्षमय घडामोडींचे भावनिक आणि धक्कादायक चित्र ' ती ' या लघुचित्रपट चित्रित करण्यात आले आहे. राहुल जाधव दिग्दर्शित ' ती ' चे प्रदर्शन येत्या रविवारी दिनांक १९ जानेवारी रोजी बाणेर येथे होणार आहे.

' ती ' या फिल्मची गोष्ट आहे आजकालच्या सुशिक्षित आई-वडिलांची आणि त्यांच्या मुलीची. व्यवहारी जगात वावरणाऱ्या आई वडिलांचे मुलांकडे होणारा दुर्लक्षपणा आणि त्याचा मुलांवर होणारा दुष्परिणाम या गोष्टींवर ती शॉर्टफिल्म भाष्य करते. आजच्या जगात देखील आपल्याला मुलगाच पाहिजे हा हट्ट एज्युकेटेड पॅरेंट्सचा असून सुद्धा का ?   मुलगी का नको ?  आणि आजच्या आई वडिलांचं पार्टी तसेच लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड जपण्यासाठी उगाचच मोठे पणाचा आव आणुन राहणे. यावरही लघुपटतून दाखवले आहे. या एकंदरीत परिनामांचा परिपाक , त्यामुळे मुलं  डिस्टर्ब झाल्यावर कोणत्या स्टेज ला जातात या काही गोष्टी या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवल्याचे सांगत आपण सामाजिक विषय हाताळल्याचे दिग्दर्शक राहुल जाधव यांनी सांगितले. ती , च्या कथेचे लेखक आशुतोष आंभोरे , राहुल जाधव तर कॅमेरा प्रफुल मानवार, प्रो. मॅनेजर - संभाजी बरबोले, सचिन पवार , मेकअप हेअर - नेहा अंधारे, दीप्ती सरवदे, , लाईट - अक्षय रिठे , केटरिंग - अभिषेक गायकवाड , संकलन DI -रोहित हब्बू, BGM - विनय देशपांडे , डबिंग - Audio culture Studio , पोस्टर - रोशन एडके प्रशांत तांबे या तांत्रिक कलाकारांच्या योगदानासह मुख्य कलाकार - माऊ - सिद्धी शिळीमकर, अनुज - तनुज गावडे, माऊ आई - रेणू आगरवाल, माऊ पप्पा - साईप्रसाद जोशी, अनुज आई - सुजाता रनसिंग, अनुज पप्पा - स्वप्नील लांडगे. या कलाकारांनी कामे केली आहेत.

Proluxe Wellness & Production's Pvt. Ltd

4th floor,Orbisoul 46 Downtown, Pashan - Sus Rd, Baner, Pune, Maharashtra 411045.

याठिकाणी ' ती ' या लघुचित्रपटाचे स्पेशन स्क्रिनिंग होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा