| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक २० : स्थानिक कलाकारांना संधी देत ' ती ' या लघुचित्रपटाची निर्मिती चितपट फिल्म प्रोडक्शन अंतर्गत राहुल जाधव यांनी केली. ति ' चे रविवार दिनांक २९ रोजी सायंकाळी ४.१५ वाजता Proluxe Wellness & Production's Pvt. Ltd, 4th floor,Orbisoul 46 Downtown, Pashan - Sus Rd, Baner, Pune येथे स्पेशल स्क्रिनिंग झाले. यावेळी चित्रपट दिग्दर्शक मिलिंद लेले, उद्योजक अरुण पाटोळे, उद्योजक संदीप राठोड, शिरीष आप्पा साठे, पत्रकार राम शेडगे, सागर सूर्यवंशी, पत्रकार प्रसाद वडघुले, पत्रकार विनय सोनवणे, सिने अभिनेता संभाजी बारबोले, अमर चाकोतकर, सिने अभिनेता प्रमोद साखरे यांच्यासह सामजिक , राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
' ती ' या लघुचित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जाधव यांनी केले आहे. अथक परिश्रम आणि अनेक संकटांवर मात करीत ' ती ' शॉर्टफिल्म पूर्णत्वास आली. यामध्ये माऊ - सिद्धी शिळीमकर, अनुज - तनुज गावडे, माऊ आई - रेणू आगरवाल, माऊ पप्पा - साईप्रसाद जोशी, अनुज आई - सुजाता रनसिंग, अनुज पप्पा - स्वप्नील लांडगे.माऊ बहीण - श्रेया लोहार या कलाकारांनी कामे केली असून, निर्माता-दिग्दर्शक - राहुल जाधव, लेखक - राहुल जाधव, आशुतोष अंभोरे, कॅमेरामन - प्रफुल मानवार, सह कॅमेरामॅन 2 :- प्रसाद मोरे, प्रो. मॅनेजर - सचिन पवार, मेकॅप हेअर - नेहा अंधारे, दीप्ती सरवदे, लाईट - अक्षय रिठे, केटरिंग - अभिषेक गायकवाड, संकलन DI -रोहित हब्बू, BGM - विनय देहपांडे , Dubbing - Audio culture Studio , पोस्टर - रोशन एडके यांनी तांत्रिक बाजू सांभाळली आहे. उपस्थित मान्यवर प्रेक्षकांनी ती चे भरभरून कौतुक केले असून निर्मिती प्रक्रियेतील संपूर्ण टीमला उपस्थितांनी भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा