Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, २६ जानेवारी, २०२५

डॉ.जितेंद्र वडशिंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी 'हेरिटेज वॉक' चे आयोजन

 बाबुरावजी घोलप कॉलेज इतिहास विभागाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे 'हेरिटेज वॉक

| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक २५ : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील इतिहास विभागाच्यावतीने इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे 'हेरिटेज वॉक' साठी पुणे विद्यापीठातील मुख्य इमारत येथे अभ्यास दौरा काढण्यात आला. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्पूर्त प्रतिसाद देत ऐतेहासिक स्थापत्य, संदर्भ जाणून घेतले. इतिहास विषयासाठी विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण करण्यासाठी नेहमी अग्रेसर असलेले इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉ.जितेंद्र वडशिंगकर यांनी विद्यार्थ्यांना दिनांक २५ जानेवारी रोजी झालेल्या या  'हेरिटेज वॉक' साठी  प्रोत्साहन दिले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील मुख्य इमारत परिसरात जाणासाठी पोतदार संकुल येथून भुयारी मार्ग आहें. तेथे ब्रिटिशांसाठी जेवण तयार करून मुख्य इमारती मधील अधिकाऱ्यांना देत असत. या भुयारी मार्गासह विदयापीठतील शिवाजी सभागृह, ज्ञानेश्वर सभागृहाचा इतिहास विद्यार्थ्यांनी समजून घेतला. तसेच मुख्य सभागृहातील भोर संस्थांनाचे शस्त्र प्रदर्शन ज्यामध्ये मराठा काळातील शास्त्राची ओळख विद्यार्थ्यांना झाली. तसेच विविध प्रसंगातील व्यंग चित्राचे प्रदर्शन मुलांनी पहिले. ब्रिटिश काळातील इमारत कशी तयार झाली याची माहिती श्री तुकाराम शिंदे इतिहास विभागातील संशोधक यांनी विद्यार्थ्यांनी दिली. या अभ्यास दौऱ्यात इतिहास विषयांचे विद्यार्थी , इतिहास विभागातील प्रा तुषार भुसे , डॉ. ज्योती रामोड, डॉ जितेंद्र वडशिंगकर यांनी सहभाग घेतला. पुणे विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्रा. तुकाराम शिंदे यांनी पुणे विद्यापीठातील ऐतिहासिक वास्तूचा इतिहास सांगितला. सदर ऐतिहासिक भेटी  व हेरिटेज वॉक साठी पुणे विदयापीठ इतिहास विभाग प्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर मॅडम व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा