Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, ३० जानेवारी, २०२५

मराठा वधू - वर परिचय मेळाव्याचे तळेगाव येथे आयोजन

 

| सांगावा न्यूज | पिंपरी दिनांक  ३० : मराठा समाजातील अविवाहित तरुण-तरुणींसाठी जोडी जमवा वधू-वर सूचक केंद्राच्यावतीने वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (दि. ०२ फेब्रुवारी) रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हा मेळावा तळेगाव दाभाडे येथील वैशाली मंगल कार्यालयात होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते होईल, अशी माहिती जोडी जमवा वधू - वर सूचक मंडळाचे अध्यक्ष तुषार क्षीरसागर यांनी दिली.

             मंडळातर्फे वधू-वर परिचय मेळावा दरवर्षी आयोजित केला जातो. मराठा समाजातील विवाहेच्छुक युवक-युवती, तसेच त्यांच्या पालकांना अनुरूप स्थळ शोधून विवाह जुळवण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने मिळते. या मेळाव्यामध्ये युवक - युवतींना आयुष्याचा जोडीदार कसा असावा, त्याच्या अपेक्षा या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे मराठा समाजातील इच्छुक वधू - वरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा