Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, १० जानेवारी, २०२५

थेरगाव मध्ये अमर ज्वेलर्स चा उद्घाटन सोहळा संपन्न

 

| सांगावा न्यूज| गेल्या पाच दशकांपासून मराठवाड्यातील सोने चांदी ग्राहकांचा विश्वास संपादन करणारी सुवर्णपेढी 'अमर ज्वेलर्स' ची शाखा पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथे सुरू झाली आहे. थेरगाव हॉस्पिटल रोड, संदीप नगर, एच डी एफ सी एटीएम शेजारी ( इंद्रायणी नगर ) थेरगाव येथे दिनांक ७ जानेवारी रोजी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. नगरसेविका मानिषाताई पवार, सामाजिक कार्यकर्ते तानाजी बारणे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले व भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सनी बारणे यांच्या हस्ते रिबीन कापून अमर ज्वेलर्स या दालनाचे उद्घाटन झाले.

यावेळी बोलतांना अमर ज्वेलर्स चे संचालक अमर चाकोतकर म्हणाले की, "सोने चांदीची कलाकुसर करणे, आकर्षक दागिने बनवणे आणि योग्य दरात सोने चांदीचा व्यवसाय करणे हा आमचा वडिलोपार्जित धंदा आहे. यामध्ये वडिलांनी जो मराठवाड्यात ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे तसाच विश्वास आणि नाते याठिकाणी अमर ज्वेलर्स आणि ग्राहकांमध्ये कायम राहील." दरम्यान उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. तसेच जमलेला मित्र परिवार आणि नातेवाईकांकडून अमर ज्वेलर्स परिवाराला शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात ज्येष्ठ पत्रकार अनिल वडघुले यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. तसेच प्रमुख पाहुण्यांसोबत उपस्थित मान्यवरांमध्ये शीतल मोरे ( महारष्ट्र प्रदेश अध्यक्ष), रामकुमार शेडगे ( चित्रपट दिगदर्शक ), संभाजी बरबोले ( सिने अभिनेते ) ,राहुल जाधव ( सिने दिग्दर्शक ), प्रमोद साखरे ( सिने अभिनेता ) , प्रेम झेंडे ( नाट्य निर्माते ) , विनोदभाऊ पवार ( सामाजिक कार्यकर्ते ), भीमाशंकर मामा कापसे ( आझाद ग्रुप अध्यक्ष महाराष्ट्र ) रमेश चौधरी ( चित्रपट दिग्दर्शन ), रमेश परळीकर ( अभिनेते ) प्रसाद वडघुले ( पत्रकार ) यांच्यासह मित्रपरिवार व नातेवाईक उपस्थित होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय सोनवणे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा