Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, १० जानेवारी, २०२५

सांगावा न्यूजचा इम्पॅक्ट : अस्वच्छतेमुळे अनेक महिने वापराविना पडून असलेले स्वच्छतागृह लोकं वापरू लागली

 तक्रार दिल्यापासून १६ दिवसांनी उद्यान विभागाला आली जाग : संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विलंबनंतर स्वच्छतागृहाची साफसफाई 
गेली सहा महीन्यांपसून येथील टॉयलेट व मुतारीची साफसफाई होत नव्हती : सांगावा न्यूजच्या टीमने सातत्याने पाठपुरावा केला

| सांगावा न्युज | थेरगाव, दिनांक ९ : पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथील बापुजिबूवा उद्यानातील स्वच्छतागृह गेली सहा महिन्यांपासून साफसफाई केले नव्हते. उद्यान विभागाचे अधिकारी यांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून कळवले. सारथी वर तक्रार दिली. यासंदर्भात सांगावा न्यूजवर वारंवार बातम्या देवून पाठपुरावा केला. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ सतर्कता दाखवली नाही. पुन्हा यासंदर्भात बातम्या लावून धरल्या नंतर तब्बल १६ दिवसांच्या विलंबाने उद्यान विभागाला जाग आली आणि दिनांक ९ जानेवारी रोजी येथील स्वच्छतागृह क्लीन केल्याचे फोटो संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पाठवले. 

तरीदेखील येथील स्वच्छतागृहाची स्वच्छ्ता व्यवस्थित झाली नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे होते. त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात केवळ पाणी मारून साफसफाई केली. साफसफाईसाठी लिक्वीड किंवा इतर साधने वापरली नाहीत किंवा SOP ( Standard Work Process ) फॉलो केली नसल्याचे निदर्शनास आले. तेव्हा पुन्हा सांगावा न्यूज प्रतिनिधीने पाठपुरावा केला असता संबंधित कर्मचाऱ्यांनी येथील टॉयलेट्स मुतारी व्यवस्थित स्वच्छता करून घेतले. अशाच पद्धतीने दररोज येथील स्वच्छतागृह स्वच्छतेसाठी वापरली जाणारी साधने उपयोगात आणून रोजच्या रोज साफसफाई केली जावी अशी नागरिकांची मागणी आहे.

" आम्ही जेव्हा जेव्हा थेरगाव येथील बापुजिबुवा या उद्यानात सहकुटुंब यायचो तेव्हा येथील अस्वच्छ असलेल्या स्वच्छतागृहाची दुर्गंधी यायची. त्यामुळे येथील स्वच्छतागृह वापर करता येत नव्हते. सांगावा न्यूज मध्ये सातत्याने बातम्या आल्यामुळे येथील साच्छतागृह स्वच्छ झाले आहे. सांगावा न्यूजचे मी मनापासून आभार मानतो. जनतेचा आवाज बनून, सामान्य नागरिकांच्या समस्या सांगावा न्यूज मांडत आहे"

_____ संभाजी बारबोले ( स्थानिक नागरिक )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा