Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, ६ जानेवारी, २०२५

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिका पत्रकार कक्षात बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

 पत्रकार दिनाचे औचित्य साधून युवा वेध या साप्ताहिकाचे प्रकाशन

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ६ : महाराष्ट्राचे 

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मराठीतील पाहिले वृत्तपत्र ' दर्पण ' सुरू केले होते. सहा जानेवारी हा दिवस पत्रकार साजरा केला जातो तसेच बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती देखील याची दिवशी साजरी केली जाते. पिंपरी चिंचवड महानरपालिकेच्या पत्रकार कक्षात आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष गणेश मोकाशी व पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापालिका जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेक पत्रकार उपस्थित होते.

यावेळी पत्रकार दिनाचे औचित्य साधून साप्ताहिक युवा वेध चे प्रकाशन देखील करण्यात आले. तसेच मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षपदी गणेश मोकाशी यांची नियुक्ती झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड पत्रकर संघाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महापालिका जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांचा देखील यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. याच बरोबर नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे विशेष कौतुक करण्यात आले त्यामुळे अध्यक्ष अनिल वडघुले यांना देखील पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक केले. यावेळी पत्रकार विनय सोनवणे, माऊली भोसले, रामकुमार शेडगे, सागर सूर्यवंशी, पराग डिंगणकर, अशोक कोकणे, संतोष गोतावळे इत्यादी पत्रकार मंडळी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा