Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, २ जानेवारी, २०२५

सुनील काटमोरे यांनी छापलेल्या दिनदर्शिकेचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

 

| सांगावा न्यूज | मुंबई, दिनांक २ : शिवसेना संपर्कप्रमुख सुनिल काटमोरे साहेब यांच्या कार्याचे उद्धव ठाकरे यांच्या कडून कौतुक केले. शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धाराशिव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सुनील काटमोरे यांनी छापलेल्या दिनदर्शिकेचे लोकार्पण मातोश्री निवासस्थानी मुंबई येथे करण्यात आले.

दिनदर्शिकेचे वितरण करतांना सभापती युवराज काटे, उद्योजक शिवाजीराव पवार सर, पिंटू नाईकवाडी,भूम परांडा विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे , शिवसेना धाराशिव जिल्हा श्री भगवान बांगर शिवसेना भुम चे माजी शहर प्रमुख व शिवसैनिक पदाधिकारी.

"शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली  सुनिल काटमोरे अत्यंत चांगल्या पद्धतीने संघटनात्मक काम करत आहेत. संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी व संघटना हाताळण्याची क्षमता असलेलें स्मित भाषा शैली असलेले आणि प्रत्येक पदाधिकारी यांना आपलेसे करणारे श्री सुनील काटमोरे साहेब यांच्या मध्ये एक वेगळेपण आहे. तसेच लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर आणि जिल्हा प्रमुख आमदार कैलास दादा पाटील आणि मा सुनिल काटमोरे साहेब यांच्या मध्ये असलेल्या समन्वया मुळे आज धाराशिव जिल्ह्यात शिवसेना आक्रमक पणे काम करत आहे. पुढिल काळात नक्कीच महाराष्ट्रात शिवसेनेचे सोनेरी दिवस परत येतील हा विश्वास आहे" 

___भगवान बांगर ( शिवसेना :  धाराशिव जिल्हा )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा