Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, ३१ डिसेंबर, २०२४

सारथी वरील तक्रारींचे निवारण होत नाही : अधिकारी कार्यालयात दिसत नाहीत ! सहा महिन्यांपासून उद्यानातील स्वच्छतागृह साफसफाई होत नाही

 
थेरगाव येथील बापुजीबुवा उद्यानातील स्वच्छतागृहाची अवस्था 
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ३१ : स्मार्ट सिटी कडे मार्गक्रमण करीत असलेल्या आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथील बापूजिबुवा उद्यानातील स्वच्छतागृह अनेक महिन्यांपासून स्वच्छ केलेले नाही. त्यामळे तेथील मुतारी आणि टॉयलेट्स अत्यंत घाणेरडे झाले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथील उद्यानात येणारे लहान मुले, महिला, आणि वृध्दांना तसेच सामान्य नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास होत असून त्यापासून आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शिवाय अत्यंत घाण, मैला आणि इतर राडा रोडा आत स्वच्छ्तागृहामध्ये असल्यामुळे लोकं याचा वापर करू शकत नाहीत. 

या संदर्भात गेली आठवडा भरापासून बातम्या प्रसारित होत असून असून संबंधित प्रशासन त्याची दखल घेत नाही असे चित्र आहे. जवळ जवळ गेली सहा महिन्यांपासून येथील स्वच्छतागृह, मुतारी, टॉयलेट्स साफसफाई केलेले नाही. याचे व्हिडिओ, फोटो, बातमी लिंक्स वेळोवेळी संबंधित अधिकारी राजेश वासवे तसेच सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांना पाठवले आहेत. शिवाय महानगर पालिकेच्या सारथी तक्रार क्रमांकावर तक्रार देखील दिली आहे. तरीदेखील आजतागायत येथील स्वच्छतागृह, मुतारी, टॉयलेट्स साफसफाई केलेले नाही. यासंदर्भात कार्यवाही केलेली नाही. उद्यान विभागाचे राजेश वासवे हे नागरिकांचे फोन उचलत नाहीत. त्यांच्या वॉट्सप नंबरवर गेलेल्या तक्रारी आणि समस्यांच्या बातम्यांचे लिंक्स याला रिप्लाय देत नाहीत. प्रत्यक्ष जेव्हा जेव्हा त्यांच्या कार्यालयात जावून भेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा ते त्यांच्या केबिन मध्ये उपस्थित नव्हते. त्यांच्या केबिन बाहेरील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ते साईट व्हिजिटला गेले अशी उडवा उडविची उत्तरे देतात. पण जेव्हा  आमच्या न्यूज प्रतिनिधीने प्रत्यक्ष उद्यान विभाग सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांना भेटून विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की नाही ते साईट व्हिजिटला गेले नाहीत असेच बाहेर कुठेतरी गेले आहेत ( दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजीची भेट ). यावरून असं लक्षात येते की अधिकारी कार्यालयात हजेरी लावून आपली वयक्तिक कामे करायला बिधास्त निघून जातात. यांना लोकांच्या तक्रारी निवारण करायला वेळ नाही पण व्यक्तिगत कामासाठी बाहेर फिरायला वेळ आहे असा थेट सवाल नागरिक करीत आहेत. 

" थेरगाव बापूजीबुवा उद्यान येथील मेंटेनन्स पाहण्यासाठी आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. सध्या अमाच्याकडे संबंधित उद्यानातील शौचालय स्वच्छतागृह साफसफाई साठी कॉन्ट्रॅक्ट नेमलेले नाहीत. यासंबंधी निविदा प्रक्रिया नुसार ते अंतिम टप्प्यात आहे. लवकरच तेथे मेंटेनन्ससाठी मनुष्यबळ उपलब्ध होईल. तरीदेखल येथील सुपरवाइझरला सांगून स्वच्छतागृह, मुतारी, टॉयलेट्स तत्काळ स्वच्छ करण्याच्या सूचना देतो"

___  उमेश ढाकणे ( सहाय्यक आयुक्त : उद्यान विभाग )

" सहाय्यक आयुक्त श्री उमेश ढाकणे साहेबांना वेळोवेळी बातमी सांगून किंवा प्रत्यक्ष भेटून येथील समस्या सांगितली आहे. थेरगाव येथील बापुजिबुवा उद्यानातील स्वच्छतागृह, मुतारी, टॉयलेट्स साफसफाई करून घ्यायला सांगतो असे बोलले, परंतु आठ दिवस झाले मी फॉलो अप घेतोय आजतागायत येथील स्वच्छतागृहाची स्वच्छता केलेली नाही. अगोदरच गेली सहा महिन्यापासून येथील स्वच्छतागृह साफसफाई् केलेले नाहीत. यासंदर्भात मी स्वतः सारथी वर देखील तक्रार नोंदवली असून त्याच्यावर अजून काहीच रिप्लाय नाही किंवा येथील स्वचछतागृहाची साफसफाई करण्यासाठी प्रशासनाने काहीच पाऊले उचलली नाहीत. राजेश वासवे साहेब नागरिकांचे फोन उचलत नाहीत. ते त्यांच्या कार्यालयात बहुसंख्य वेळा हजर नसतात"

___ विनय सोनवणे ( संपादक : सांगावा न्यूज )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा