| सांगावा न्यूज | पिंपरी, दिनांक ३० : पिंपरी चिंचवड शहरातून प्रकाशित होणारे साप्ताहिक वृत्तपत्र सांगावा न्यूज अल्पावधीतच वाचकांच्या पसंतचे बनले आहे. दर गुरुवारी सांगावा न्यूज प्रकाशित होत असून पिंपरी येथे या आठवड्यातील अंकाचे प्रकाशन मराठी पत्रकार परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश मोकाशी यांच्या हस्ते दैनिक लोकतंत्र कार्यालयात संपन्न झाले. यावेळी पत्रकार सागर सूर्यवंशी, पत्रकार संतोष गोतावळे आणि संपादक विनय सोनवणे उपस्थित होते.
"आजच्या डिजिटलायझेशन युगात देखील वर्तमानपत्र व साप्ताहिके आपलं अस्तित्व टिकवून आहेत. मोबाईल फोनवर ऑनलाईन बातम्या घडामोडी तत्काळ पाहता येत असल्या तरीदेखील काल किंवा मागील आठवड्यात काय काय घडले आहे हे सविस्तर वाचकांना वाचता येते ते दैनिक आणि साप्ताहिक वृत्तपत्रांमधून. डिजिटल मीडियावर आलेल्या बातम्यांमध्ये कधीही बदल करता येतो किंवा संपादकांच्या बदलत्या रूचीनुसर तसेच संबंधित बातमीच्या संदर्भात बाह्य गोष्टींचा परिणाम - तणाव याचा परिणाम होऊन बातमीमध्ये सहज बदल करणे शक्य आहे. त्यामुळे डिजिटल मीडियावर एकदा प्रकाशित झालेली बातमी पुन्हा वळववी तशी वळवता येते. सर्वात आदी ब्रेकिंग न्यूज देण्याच्या घाई गरबडीत बातमीच्या सत्यतेबाबत डिजिटल आणि सॅटेलाईट न्यूज मध्ये काही अंशी उणे अधिक हिऊ शकते. याचा अर्थ असा अजिबात नाही की डिजिटल मीडियातील बातम्या असत्य असतात. बहुसंख्य डिजिटल मीडियावर प्रकाशित होणाऱ्या बातम्या या खऱ्या असतात. डिजिटल मीडिया ही आज काळाची गरज आहे आणि आपण पण या प्रवाहाबरोबर चाललो पाहिजे. म्हणूनच Sangava News नावाने डिजिटल न्यूज पोर्टल आणि Sangava नावाने युट्यूब चॅनल देखील ऑनलाईन सुरू केले आहे.
परंतु प्रिंट मीडियातील वाचकांसमोर बातमी येण्या अगोदर त्या घडलेल्या घटनेची सत्यता पडताळून पाहण्यासाठी वेळ मिळतो. परिणामी वेळ घेवून विचारपूर्वक अचूक बातमी लिहून प्रकाशित केली जाते. त्यामुळे बातमीच्या सत्यतेबाबत वाचकांचा विश्वास आजही प्रिंट मीडियावर आहे. दिवसभर टीव्ही आणि मोबाईलवर बातम्या पाहून देखील दुसऱ्या दिवशी प्रिंट मीडियातील वर्तमानपत्र आणि साप्ताहिकामध्ये छापून आलेल्या बातम्या वाचणाऱ्या वाचकांची संख्या कमी नाही. आज घडलेल्या घटनांचे संदर्भ शोधण्यासाठी कालचे वर्तमानपत्र, भूत काळातील प्रिंट मीडियात छापून आलेल्या बातम्या आणि साप्ताहिकांमध्ये छापून आलेल्या बातम्या महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात. हा विचार करून साप्ताहिक सांगावा न्यूज सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. आज साप्ताहिक सांगावा न्यूजला विविध दैनिक आणि साप्ताहिकांचे संपादक प्रोत्साहन देत आहेत. महाराष्ट्रात नावारूपाला आलेले आणि वाचकांच्या पसंतीचे दैनिक लोकतंत्र चे संपादक गणेश मोकाशी सर यांच्या हस्ते आजच्या आठवड्यातील सांगावा न्यूज चे प्रकाशन झाले याचा आनंद आहे. मराठी पत्रकार परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश मोकाशी सर हे नेहमीच नवीन पत्रकार आणि संपादकांना मार्गदर्शन करीत प्रोत्साहन देत असतात त्यामुळे नव्या उमेदीने कार्य करण्याची ऊर्जा मिळते"
___ विनय सोनवणे ( संपादक : सांगावा न्यूज )

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा