Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, २९ डिसेंबर, २०२४

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत मांडलेल्या प्रश्नाला यश ! दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ !

 दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी भगवान बांगर यांनी प्रशासनाला केलेल्या अर्ज विनंत्यांचे फलित !

भूमीपुत्र भगवान बांगर यांच्या निवेदनाला खासदार ओमराजे निंबाळकर यांची साथ : दुधाला अनुदान सुरू !

| सांगावा न्यूज | भूम, दिनांक २९ : तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून मिळावे तसेच दुधाला हमी भाव देण्यात यावा म्हणून भूमिपुत्र भगवान बांगार यांनी वेळोवेळी प्रशासनाला अर्ज विनंत्या केल्या होत्या. याच संदर्भात भगवान बांगर यांनी दिल्ली येथे जावून धाराशिवचे कार्यसम्राट खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट घेवून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आणि लेखी निवेदन दिले होते. याची तात्काळ दखल घेत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी थेट संसदेत प्रश्न मांडला व दुधाला हमीभाव मिळाला पाहिजे अशी मागणी केली. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा म्हणून दुधाला प्रती लिटर मागे अनुदान मिळावे ही देखील मागणी केली होती. याला यश आले असून आत्ता तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाच्या प्रती लिटर ५ रुपये प्रमाणे अनुदान मिळायला सुरुवात झाली असून आपण केलेल्या धडपडीला आणि लोकनेते खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कायद्याच्या चौकटीत राहून केलेल्या कार्याला यश आल्याची भावना व्यक्त करून सदर माहिती भगवान बांगर यांनी सांगावा न्यूजला दिली.

"खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे अनुदान मिळण शक्य झाले. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मि दुधाच्या प्रश्नावर गेली ६ महिने प्रशासनाला भांडतोय. यासंदर्भात अनेक वेळा उपोषण नोटीस दिले आहेत. जेव्हा जेव्हा मी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपोषणाचे हत्यार उगारले तेव्हा तेव्हा प्रशासनाच्या वतीने मला विनंती केली म्हणून उपोषण मागं घेतलं. त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांची दिल्लीत भेट घेवून निवेदन दिले. तसेच कमिशनर यांना सुचणा करण्याची विनंती केली होती . आज आपण पाहतोय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सुचणे मुळं हजारो शेतकऱ्यांना अनुदान मिळाले. यामुळे भुम मध्यें अनेक चेअरमन व शेतकरी यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांचा सन्मान देखील केला आहे . आत्तापर्यंत ३,४७० शेतकऱ्यांना दुधाच्या अनुदानाचा लाभ मिळाला आहे याचा आनंद आहे"

___ भगवान बांगर ( शिवसेना : धाराशिव जिल्हा )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा