Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२५

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने उत्कृष्ट पोलिस अधिकारी व समाज सेवक पुरस्कार सोहळा संपन्न


| सांगावा न्यूज | दिनांक २१ : चाकण जिल्हा पुणे येथे छावा मराठा सेनेच्या वतीने दि.१९/०२/२०२५ रोजी रोटरी क्लब चाकण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने उत्कृष्ट पोलिस अधिकारी व समाज सेवक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खेड आळंदी मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार श्री बाबाजीशेठ काळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ भोर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व दिप प्रज्वलन करून झाली. संघटनेचे प्रदेश महासचिव श्री सचिन भाऊ भिसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले. यावेळी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री विलास भाऊ पाटील, प्रदेश महिला अध्यक्ष सौ संगीता ताई नाईकरे पाटील, महिला आघाडी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य  सौ. शितलताई मोरे-भिसे पाटील, पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री विशाल भाऊ भराटे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री राहुल भाऊ धस, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीकांत भाऊ घुले, युवक जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ निकाळजे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण भाऊ रेड्डी, सौ. संगीताताई कड पाटील, सौ ज्योतीताई पडवळ, सौ ज्योतीताई खंडागळे, रंजनाताई चणे व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळा मा.आ. बाबाजीशेठ काळे, सुनील भाऊ भोर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता ह.भ.प सौ ज्योतीताई गरुड यांच्या शिवचरित्र व्याख्यानाने झाली. या कार्यक्रमाला मराठा सेनेचे सर्व पदाधिकारी व बहुसंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा