| सांगावा न्यूज | सांगावी, पुणे दिनांक ५ : जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी येथील इतिहास विभागाच्या वतीने पोस्टर प्रदर्शनचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात द्वारे समाजसुधाकर, शिक्षणक्षेत्रात ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला असे शिक्षण महर्षी, मराठा काळातील युगपुरुष यांची माहिती विद्यार्थ्यांना पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळाली. सामजिक शिक्षणीक क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या महापुरुषांची सचित्र माहिती विद्यार्थ्यांना कळावी हा उद्देश दिनांक ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या या कार्यक्रमाचा होता तो कार्यक्रम सफल झाला.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक शिक्षणमहर्षी बाबुरावजी घोलपसाहेब स्मृती सप्ताह निमित्त पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर पोस्टर प्रदर्शनाचे उदघाटन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव आदरणीय मा.ए एम जाधव साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप, उप प्राचार्या डॉ. वंदना पिंपळे, कला विभागाचे समन्वयक डॉ. अर्जुन डोके, इंग्रजी विभागाचे डॉ. अनिल लोंढे, डॉ. राजेंद्र सरोदे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भरत राठोड,डॉ. बालघरे उपस्थित होते.
मा. जाधव साहेब म्हणाले विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवस्था कशी सुरु झाली. ज्या शिक्षणामहर्षीनी योगदान दिले त्यांच्या करायची माहिती दिली पाहिजे असे मत प्रतिपादन केले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप म्हणाल्या विद्यार्थ्यांनी अश्या उपक्रमात सहभागी होऊन थोरामोठ्यांचे विचार अंगीकारले पाहिजेत. असे म्हणाल्या व यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
इतिहास विभागातील प्रा. तुषार भुसे,डॉ. ज्योती रामोड विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र वडशिंगकर यांनी विद्यार्थ्याकडून पोस्टर तयार करून घेतली. गायत्री कोळेकर, पूनम राठोड, साक्षी नागसेन , शाश्वती जगताप, निकिता धोत्रे, उदयन गायकवाड, शिवतेज कोंडे, देवकी कालेकर, शेजिया पठाण, गिरीश, ऐश्वर्या वाघमारे हे विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा