Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५

प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सव २०२५ निमित्त भव्य रथ यात्रेचे आयोजन

 

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ५ : विश्वकर्मीय समाज पिंपरी चिंचवड शहर सामाजिक संस्था व सकल विश्वकर्मीय समाज बांधव माता भगिनी आयोजित भव्य रथ यात्रा व मिरवणूक सोमवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी पाच ते आठ वाजता निघणार संपन्न होणार आहे. प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सव २०२५ च्या आयोजनातील मुख्य भाग म्हणून ही रथ यात्रा खास आकर्षण असणार आहे.

रथ यात्रा मिरवणुकीचा मार्ग आकुर्डी खंडोबा मंदीर चौक ते प्रभू विश्वकर्मा मंदिर यमुनानगर निगडी असा असणार आहे. या भव्य दिव्य रथयात्रा व मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये वारकरी संप्रदायांमधील परंपरा जपत जवळजवळ १५० वारकरी विद्यार्थी टाळ आणि मृदुंगाच्या नादामध्ये नामघोष करत या मिरवणुकीच्या अग्रभागी असणार आहेत. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे, सामाजिक प्रबोधन करण्याच्या दृष्टीने आरोग्य, शिक्षण व आर्थिक सक्षमीकरण तसेच इतर बाबतचे प्रबोधन या मिरवणुकीच्या माध्यमातून विश्वकर्मीय समाज पिंपरी चिंचवड शहर सामाजिक संस्था करणार आहेत. रथयात्रा व भव्य मिरवणूक वेळ सोमवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी पाच ते आठ असणार आहे.

महाप्रसादाची वेळ रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत असणार आहे. महाप्रसादाचे स्थळ प्रभू विश्वकर्मा मंदिर यमुनानगर निगडी येथे असणार आहे. या भव्य रथयात्रा व मिरवणुकीला भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे, तसेच विधानपरिषद आमदार अमित गोरखे, तसेच पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर पुणे जिल्ह्याच्या परिसरातील म्हणजेच खेड आंबेगाव, जुन्नर, मावळ, मुळशी, लोणावळा या परिसरामधील समाज बांधव माता भगिनी ह्या भव्य रथयात्रा मिरवणुकीला उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण सृष्टीचे सृजन कर्ता म्हणजेच विश्वाचे पहिले शिल्पकार व वास्तुकार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे, सदर प्रभु विश्वकर्मा जयंती माघ शुद्ध १३ दरवर्षी मोठ्या उत्साहात महाराष्ट्रातील गावोगावी साजरी केली जाते. पिंपरी चिंचवड शहरातून प्रभू विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून काढण्यात येणाऱ्या भव्य रथ यात्रे दरम्यान प्रबोधनाचा भाग म्हणून नागरिकांनी देश विकासासाठी टॅक्स वेळोवेळी भरावा अशा आशयाचे फलक लावून अनोख्या पद्धतीने प्रबोधन केले जाणार असल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विद्यानंद मानकर यांनी सांगितली. पत्रकार परिषदेत विद्यानंद मानकर यांच्या सह भगवान श्राध्दे , लहू सुतार यांच्या सह इतर समाज बांधव उपस्थित होते . यावेळी सकाळ विश्वकर्मीय समाज ध्वज अनावरण करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा