| सांगावा | सांगावी, दिनांक ८ : बाबुरावाजी घोलप महाविद्यालयात दिनांक १ ते ७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक कै. श्री. बाबुरावजी घोलप यांच्या स्मृती सप्ताह निमित्त महाविद्यालयात विविध उपक्रम घेण्यात आले.
महाविद्यालयात विविध स्पर्धा पोस्टर्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पाक कला बनवणे, फनफेअर तसेच भौतिकशास्त्र विभागामार्फत महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
आजच्या काळात पाहिले तर धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला आरोग्याकडे लक्ष देणे कमी झाले आहे. त्यामुळे आरोग्य तपासणी करणे आवश्यक झाले आहे. महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभाग मार्फत प्राध्यापक व प्रशासकीय सेवकांची एकूण १०० लोकांची ईसीजी इलेक्ट्रोकार्डो ग्राफी, बीपी चेक करणे, माणसाच्या शरीरातील शुगर चेक करणे, बॉडी मास इंडेक्स म्हणजेच शरीरातील चरबी फॅट्स किती आहेत याचा अभ्यास करून तपासण्या करण्यात आल्या तसेच संबंधित प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजय घाडगे यांनी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये शरीराची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. संगीता जगताप यांनी सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख व विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.विजय घाडगे, समन्वयक डॉ. सतीश एकार, श्रीमती .ज्योती यंदे, मिस.रीना लोहार, श्री .रोहित तीकोटे, प्रशासकीय सेवक श्री. विनय कामटे, श्री. सुभाष नागपुरे यांनी आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रा. विजय घारे, प्रा. चंदा हासे, उपप्राचार्य डॉ.वंदना पिंपळे, डॉ.राजेंद्र सरोदे, डॉ.प्रवीण चोळके, डॉ. अनिल लोंढे यांनी सहकार्य केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा