| सांगावा न्यूज | धाराशिव, दिनांक ८ : कुंथलगीरीचा पेढा सर्वत्र प्रसिद्ध आहे. 'कुंथलगीरीचा पेढा' या नावाने प्रसिद्ध असलेल्या पेढ्यासाठी भूम परांडा वाशी मतदार संघातील गावा गावातून उत्कृष्ट दर्जाचा खवा निर्मिती केली जाते. याचे मुख्य बाजारपेठेचे ठिकाण किंवा व्यापारी देवाण घेवाण ही सरमकुंडी फाटा येथून होत असते. सरमकुंडीचा पेढा म्हणूनही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कुंथळगिरी आणि सरमकुंडी फाटा याठिकाणी आता भेसळयुक्त खवा पेढा हा गुजरात राज्यातून येत असून तो आरोग्यास धोकेदायक आहे. कमी किमतीत असा हा गुजरातचा भेसळयुक्त खवा येत असल्याने येथील स्थानिक शेतकरी निर्माण करीत असलेल्या उत्तम दर्जाच्या खव्याला देखील कमी भावात विकावा लागत आहे. परिणामी स्थानिक दूध उत्पादक व खवा निर्मिती करणारे शेतकरी यांचे नुकसान होत आहे. गुजरात च्या भेसळयुक्त माव्यावर तातडीने बंदी घाला अशी मागणी काल थेट लोकसेभेत मांडली ती लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांनी. स्थानिक शेतकरी आणि उत्तम दर्जाचा खवा उत्पादन करणाऱ्या स्थानिक व्यापाऱ्यांच्या हितासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहात प्रखरतेने मांडलेला हा प्रश्न नक्कीच लोकहिताचा आहे.
"खासदार ओमराजे निंबाळकर यांचे देशाच्या सर्वोच्च सभागृहातील रौद्र रूप पाहिले तर, शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, दूध अशा इतर सर्व गोष्टीवर लोकसभेत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अतिशय उत्तम प्रकारे, आपल्या मराठी मायबोलीतून देशाच्या सर्वोच्च सभागृहात बाजू मांडली. खरंतर असे लोकप्रिय खासदार मिळणं हे आपल्या जिल्ह्याचे भाग्य आहे"
____ भगवान बांगर ( शिवसेना धाराशिव जिल्हा )

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा