| सांगावा न्यूज | पुणे दिनांक १० : राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीत केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी आक्रमक झाले आहेत. शिवाजी महाराजांनी लाच देवून आग्र्याहून सुटका केली होती असे राहुल सोलापूरकर म्हणाले होते. हे वक्तव्य अत्यंत खोटे असून पराक्रमी राष्ट्र पुरुषांचा अपमान करण्याचा उद्देशाने जाणून बुजून केले गेले. असे हे वक्तव्य
राष्ट्रद्रोह असून त्यांच्यावर तसा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने अभिनेते राहुल सोलापूरकर यांना इथून पुढे महामंडळाचे सदस्य ठेवू नये अशी विनंती संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष माननीय मेघराज भैया भोसले यांना छावा मराठा संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्याकडून निवेदन देण्यात आले. यामध्ये राष्ट्र द्रोहाच्या गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसह चित्रपट महामंडळाच्या पदावून त्यांना बरखास्त करण्यात यावे अशी मागणी छावा मराठा संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्याकडून , अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांना करण्यात आली. यावेळी छावा मराठा महिला संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा संगीताताई नाईकरे , प्रदेश उपाध्यक्षा शितलताई मोरे यांच्या सह इतर पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा