| सांगावा न्यूज | पोलादपुर दिनांक २६ : मिनी महाबळेश्वर असलेल्या कुडपण येथील जगबुडी नदीच्या तीरावर मंगेश चिकणे परिवाराच्या कै काशीबाई शंकर शिवराम चिकणे यांच्या वडील प्रजित जमिनीत स्वयंभू शिव भोलेनाथ याची शिव पिंड मिळाली आहे. त्या पिंडीच्या ठिकाणी असलेल्या परिसरात ह.भ.प सत्यवान बाबा महाडिक याच्या मार्गदर्शनाखाली आज महाशिवरात्री निमित्त सत्यनारायणाची महापूजा गणेशपूजा कळसपूजन संपन्न झाले. ह.भ.प श्री किसन महाराज सकपाळ यांच्या हस्ते पूजा झाली. दिपपूजा व गणेशपूजा तसेच नवग्रह पूजन इत्यादी विधी स्वामी संतोषजी जंगम यांनी केले.
ह.भ.प रवींद्र महाराज सकपाळ याचे कीर्तन झाले. यावेळी हभप विलास जाधव सर, तुकाराम शिंदे, हभप अंकुश पार्टे, रोशन कासुरडे, बाळू चिकणे, वासुदेव चिकणे, अशोक चिकणे, रुद्र जाधव आणि चिकणे परिवारातील माजी सरपंच मंगेश चिकणे, बबन चिकणे दीपक चिकणे, मनोहर चिकणे ,चंद्रकांत चिकणे यांनी उपस्थित राहून स्वखर्चातुन स्वयंभू शिव आनंद महोत्सव व मंदिर जीर्णोद्धार केला . कुडपण जगबुडी नदीच्या उगमस्थान असलेल्या गवेडा येथे जगबुडी नदीच्या तिरावर कुडपण ( बु ) पोलादपूर इथे शिव भक्त व शिव प्रेमी याच्या उपस्थितीमध्ये सपन्न झालेल्या या कार्यक्रमात भक्तिमय वातावरणात भक्तगण तल्लीन झाले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा