| सांगावा न्यूज | पाथर्डी ( अहील्यानगात ), दिनांक २६ : तालुक्यातील मालेवाडी - खरवंडी येथील विकासकामांचे भूमिपूजन दिनांक २३ फेब्रुवारी रोजी आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार मोनिकाताई राजळे यांचा विजय हा लाडक्या बहिणींसह प्रामाणिक कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचे फलित आहे. खरवंडी परिसरातील विकास कामांसाठी राजळे कुंटुबाने गेल्या तीन पिढ्यांपासून काम केले आहे. विकास कामात कधीच भेदभाव त्यांनी केलेला नाही. आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निडणुका भारतीय जनता पक्षाला जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी करावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्ष काशीताई गोल्हार यांनी केले.
मालेवाडी येथे एक कोटी रुपये खर्चाच्या दोन बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ आमदार राजळे यांच्या हस्ते करण्यात आला, या वेळी गोल्हार बोलत होत्या. या वेळी आ. मोनिकाताई राजळे, आजीनाथ कीर्तने, अंकुशराव कासुळे, दत्तात्रय पठाडे, महेश बोरुडे, रशिदभाई शेख, अशोक खरमाटे, महादेव जायभाये, वामनराव कीर्तने, बाळासाहेब गोल्हार, पिराजी कीर्तने, महेश हजारे, दादासाहेब मोरे, सखाराम दादा खेडकर उपस्थित होते.
आमदार राजळे यांच्या माध्यामातून मालेवाडी गावाला १६ बंधारे मिळालेले असून इतर विकासाच्या कामाला कोट्यवधी रुपयांचा निधी गाव व परिसराला दिला. मात्र, विधानसभानिवडणुकीत आम्ही मते देताना कमी पडलो. यापुढील काळात मात्र ही कसर भरुन काढू, असे अजिनाथ कीर्तने यांनी सांगितले.
"आमदार म्हणून आपण मतदार संघात आई वडिलांच्या भूमिकेत आहात. आम्ही लेकरं तुमच्याकडे हट्ट करू की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, परंतु लेकरांनी हट्टापायी मागितलेल्या मागण्या पैकी कोणत्या योग्य आणि कोणत्या अयोग्य हे ठरविण्याचे आणि योग्य तो हट्ट पूर्ण करण्याचा अधिकार आई अवडीलांचा असतो. तसा आमचा गोग्य आणि गरजेचा हट्ट आपण आमदार म्हणून पूर्ण केलात"
____ अजिनाथ जबाजी कीर्तने
"बाळ रडलं की आई त्याचे हट्ट पुरविते. मात्र, आता आईनेच रडाव का? असं वाटतयं, असे सांगून या भागातील सर्वच कार्यकर्त्यांनी बुथ सांभाळले. बोगस मतदान होऊ दिले नाही. ते सर्व कार्यकर्ते माझ्या विजयाचे शिल्पकार आहेत. प्रत्येकाचे योगदान त्यामध्ये आहे. मते कमी व जास्त पडले, याला मी फारसे महत्व देत नाही. निष्ठावान कार्यकर्त्यांची काळजी घेण्याचे काम मी करील"
______ आमदार मोनिकाताई राजळे
आमच्या पंचकृशित सातत्याने विकासकामे व्हावेत यासाठी नेहमी प्रयत्नशील असलेल्या आमदार मोनिकाताई राजळे सर्व समाजातील लोकांना सोबत घेवून कार्य करीत असतात. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ कीर्तने यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा