Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२५

भव्य रथ यात्रा व मिरवणूक काढून पिंपरी चिंचवड मधील काळेवाडी येथे संत गाडगे बाबा महाराजांची जयंती साजरी

 संत गाडगे महाराज लोक जगृतीसाठी बातमीपत्र चालवत असे ____ सोमनाथ नाढे ( व्याख्याते )


| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २६ : देशाल दिशादर्शक विचार देणारे, शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे आणि स्वच्छ्ता करून स्वच्छ्ते विषयी जागृती करणारे थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा महाराजांची जयंती पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे संपन्न झाली. दिनांक २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या या जयंती उत्सवात नागरिकांनी उत्स्पुर्त सहभाग घेतला. यावेळी गाडगे बाबा महाराजांचे कृतिशील विचार व्याख्याते सोमनाथ नाढे यांनी आपल्या व्याख्यानातून मांडले. जयंती उत्सवाचे आयोजक संतोष गोतावळे यांनी आवाहन केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील संत परंपरेचे महत्त्व लक्षात घेता काळेवाडीत झालेल्या संत गाडगे बाबांच्या जयंतीला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.

मंगळवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत मिरवणूक कार्यक्रम झाला. यामध्ये मुख्य आकर्षण म्हणून लेझिम पथक, वारकरी दिंडीमुळे कार्यक्रमाला शोभा आली. तसेच संत गाडगे महाराजांची मूर्ती असलेला भव्य रथ मिरवणुकीत असल्याने नागरिकांना महाराजांचे दर्शन घेता आले. सोमनाथ नाडे यांच्या व्याख्यानाने कार्यक्रमाची सांगता झाली. दरम्यान उपस्थित नागरिकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.

अज्ञान,अंधश्रद्धा, अस्वच्छता यांनी बुरसटलेल्या समाजाचा कीर्तनाच्या माध्यमातून समाज सुधारणेसाठी आपले जीवन व्यतीत करणारे महान संत गाडगे बाबा यांच्या कार्याचा उजाळा व्हावा यासाठी अखिल पिंपरी चिंचवड राष्ट्रसंत गाडगे बाबा जन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य रथ यात्रा व मिरवणूक वेळी मराठी पत्रकार परिषद पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश मोकाशी सर, पत्रकार सागर सूर्यवंशी, पत्रकार महावीर जाधव, पत्रकार रमेश साठे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष विनय सोनवणे हे मान्यवर उपस्थतीत होते.

तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये महाराष्ट्र परिट धोबी सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संतोष भालेकर, लाॅन्ड्री संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनिल पवार, युवा नेते नरेश कदम, शिवशाही व्यापारी संघ अध्यक्ष युवराज दाखले, राष्ट्रवादी ओबीसी सेल शहराध्यक्ष भाई विशाल जाधव, सतिश राऊत व परिट धोबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी  सहकार्य करणारे, निळं वादळ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष जितेंद्र मोटे, गौरी मोटे, शिवाजी खडसे, तसेच सकल परिट (धोबी) समाज पिंपरी चिंचवड व पत्रकार संतोष गोतावळे, सुरज राक्षे, सौ.वैशाली ताई राऊत, कल्पना ताई गायकवाड, शशिकांत राक्षे, दत्तात्रय सौदागर, यांनी परिश्रम घेतले.

संत गाडगे महाराजांचे विचार आणि कार्य सांगून गाडगे बाबा हे लोकं जगृतीसाठी बातमीपत्र चालवत होते असे मनोगत आपल्या व्याख्यानातून सोमनाथ नाढे यांनी यावेळी व्यक्त केले. त्यामुळे शिक्षण, समाज, लोक जागृतीत गाडगे बाबांचे काही लोकांसाठी अपरिचीत असलेले कार्य या व्याख्यानातून लोकांना कळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा