| सांगावा न्यूज | भूम , दिनांक २६ : धाराशिव जिल्ह्यातील भूम वाशी परांडा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर दुधाला ५ रुपये अनुदान मिळत असल्यामुळे सध्या २८ रुपयांवरून ३२ ते ३३ रुपये प्रति लिटर भाव मिळत आहे. हा बदल केवळ धराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत मांडलेल्या भूमिकेमुळे झाला असल्याचे ठाम मत श्री भगवान बांगर यांनी व्यक्त केले. खासदार साहेबांनी वेळोवेळी शेतकरी हिताची भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांना मदत होत आहे याचे समाधान व्यक्त करून कार्यकर्ता म्हणून आपली भूमिका काय असेल याची सविस्तर माहिती देखील श्री बांगर यांनी दिली.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सभागृहातील आक्रमक भाषना ची दूध संघांना भिती निर्माण झाली आहे. लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत खंबीरपणे बाजु मांडली आहे. सरकारने याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. आज भेसळयुक्त दूध भेसळयुक्त माव्यावर तातडीने बंदी घालणं आवश्यक आहे. खासदार साहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक पणे बाजु मांडताना देशाचं लक्ष वेधून घेतले आहे. दुधाच्या प्रश्नावर अनेकदा देशाच्या सर्वोच्च सभाग्रहात शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नेहमीच आक्रमक असतात. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अभ्यास पुर्ण आक्रमक पणाचा केंद्र सरकारने विचार करणं आवश्यक आहे. भेसळ थांबली तर सर्व च क्षेत्रात शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल याची खात्री आहे. म्हणूनच लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर सत्ताधारी मंडळी यांना धारेवर धरत आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भाषणाचे पडसाद जेव्हा संसदेत पडले तेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात होते त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांचा आवाज बनून संसदेत प्रश्न मांडणारे नेत्रुत्व जिल्ह्याला लाभले त्यामुळे आगामी काळात निश्चितपणे शेतकऱ्यांना फायदा होईल. खासदार साहेबांच्या धडाडीच्या कार्यपद्धतीमुळे आम्हाला कार्यकर्ते म्हणून शिवसेना पक्षाच्या वतीने आक्रमक भूमिका मांडण्याची ऊर्जा मिळत आहे. आमच्या पाठीशी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर असल्याने आम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत. दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ६ रूपये प्रमाणे अनुदान मिळण्याच्या संदर्भात लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली या आधीही आक्रमण काम केले आहे, त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुध अनुदान वितरित केले. असे रिझल्ट बेस कार्य यापुढेही लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी केले जाईल. राज्य सरकार लोकांची कामे करीत नाही असे ज्या वेळी निदर्शनास येईल त्या त्या वेळी राज्यसरकारच्या विरोधात आम्ही आक्रमक पणे काम करणार आहोत. सरकारच्या काही चिकीच्या धोरणांमुळे लोकांवर होणारा दुष्परिणाम लक्षात घेता येणाऱ्या काळात सरकार च्या विरोधात तिव्र आंदोलन उभा करणार आहोत. अशी माहीती शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्री भगवान बांगर यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा