Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, २६ मार्च, २०२५

थेरगाव येथील तुळजाई कॉलनी आणि बापुजी बुवा नगर येथे एकूण ३ अनधिकृत बांधकामांवर महापालिका अतिक्रमण विभागाची कारवाई

 



| सांगावा न्यूज | पिंपरी, दिनांक. २६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्र. २३ व प्रभाग क्र. २४ मौजे थेरगाव येथील तुळजाई कॉलनी आणि बापुजी बुवा नगर येथील एकूण ३ अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ५ हजार, २ हजार १४५ आणि ३ हजार ३६० चौरस फूट क्षेत्रफळ असलेली एकूण ३ बांधकामे मिळून एकूण सुमारे १० हजार ५०५ चौरस फुट क्षेत्रफळ असलेली बांधकामे निष्कासित करण्यात आली. 

  आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान उपअभियंता सुनिल अहिरे, कनिष्ठ अभियंता मोरे, अतिक्रमण निरीक्षक जगताप, बीट निरीक्षक सौरभ शिरसाठ, विनोद बजबळकर, पवार, मितुष सावंत उपस्थित होते. तसेच यांच्यासह धडक कारवाई पथक, २० एमएसएफ जवान, १५ मजूर, १ जेसीबी ब्रेकर, २ ट्रॅक्टर ब्रेकर व ५ हातोडे यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा